जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत दरेवाडी शाळेची चमकदार कामगिरी
इगतपुरी प्रतिनिधी
सन २०२५-२६ अंतर्गत संपन्न झालेल्या नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या अतिदुर्गम भागातील दरेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारात चमकदार कामगिरी करून घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये समूह नृत्य लहान गट तालुकास्तरावर दुसरा क्रमांक व बीट स्तरावर प्रथम क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत काळुस्ते केंद्र स्तर प्रथम क्रमांक व बीट स्तरावर दुसरा क्रमांक, चित्रकला स्पर्धा केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक व बीट स्तरावर द्वितीय क्रमांक, स्पेलिंग बी केंद्र स्तर प्रथम व बीट स्तर द्वितीय क्रमांक, वैयक्तिक गीत गायन व मॅथ बी केंद्र स्तर द्वितीय क्रमांक याप्रमाणे विविध स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. याकरीता दरेवाडी शाळेतील शिक्षक श्रीमती वंदना सोनार, संजय गातवे व महेश खैरनार यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. शाळेने संपादन केलेल्या सुयशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचे इगतपुरी तालुका गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, बिट विस्तार अधिकारी श्रीमती साळुंखे, केंद्रप्रमुख विजय पगारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत गावंडा, उपाध्यक्ष राजू भगत, सिताराम गावंडा, साईनाथ गावंडा, सुनील गावंडा व काळू गावंडा यांनी विशेष अभिनंदन करून कौतुक केले आहे.
