अखेर मिळाला अभोरे गावाला नवीन ग्रामविकास अधिकारी….

नवीन ग्रामविकास अधिकारी श्रीमती गागरे मँडम

संगमनेर लोकवेध live न्यूज 

 

सहा महिन्याचे प्रतीक्षेनंतर अखेर अंभोरे गावास ग्रामविकास अधिकारी मिळाला…यापुर्वी असलेले श्री.जेजुरकर ग्रामविकास अधिकारी कायम वादाच्या भोव-यात आणी ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामस्थ यांच्यातील संघर्ष यामुळे गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामान करावा लागला. जेजुरकर यांच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे पाठविण्यात आल्या.प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन अखेर मुजोरखोर ग्रामविकास अधिकारी श्री.जेजुरकर यांची उचलबांगडी झाल्याने गावातील ग्रामस्थ,महिला,शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाले. मुजोरखोर ग्रामविकास अधिकारी जेजुरकर यांनी शालेय मुलांना लागणारी रहिवासी दाखले,अपूर्ण घरकुल,घरकुल लाभार्थी यांची होणारी नेहमीच अडचणी केल्या.त्यामूळे होणारी कुचंबना,महिलांच्या समस्या,गावच्या विकास आराखडा बनविने,होणारा गावचा मुलभुत विकासाच्या योजना पुर्ण ठप्प झाल्या होत्या अखेर आज शुक्रवार दि.24/03/2023 रोजी संगमनेर पंचायत समिती कडून नवीन ग्रामविकास अधिकारी म्हणून श्रीमती गागरे मँडम यांनी अंभोरे ग्रामपंचायत कारभाराची कार्यालयीन सूत्रे हातात घेउन पदभार स्विकला.ग्रामविकास अधिकारी मिळाल्याने सर्वसामान्य ग्रामस्थ,महिला,शालेय विद्यार्थी,यांच्या चेह-यावर आनंद दिसत होता.
नवीन ग्रामविकास अधिकारी श्रीमती गागरे मँडम यांचा सरपंच सौ.सुरेखा भाऊसाहेब खेमनर,उपसरपंच श्री.किसनराव खेमनर,जेष्ठ सदस्य श्री.भाऊसाहेब रखमा खेमनर,सौ.सुमन सोर,प्रा.आण्णासाहेब जगनर,श्री.भाऊसाहेब खेमनर,श्री.गोरख कदम पदाधिकारी यांनी स्वागत ,सत्कार केला. प्रसंगी ग्रामस्थ श्री.सोन्याबापु जगनर श्री.हौशिराम वाघमोडे,श्री.योगेश खेमनर,नवनाथ खेमनर उपस्थित होते.याकामी संगमनेर तालुक्याचे युवा नेते आणी संगमनेर दुध संघाचे चेअरमन मा.रणजितसिंह देशमुख साहेब,मा.सरपंच श्री.भास्करराव खेमनर यांनी विशेष पाठपुरावा केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!