गावकऱ्यांनो जसे पैसे वापरतो तसे पाणी देखील वापरा :-प्रा.तुषार जगताप

 

लोकवेध live न्यूज 

पिंपळगाव नाकविंदा / सचिन लगड 

वडनेर ता.शिरुर जि.पुणे येथे जलसंपदा विभाग महाराष्ट शासन व आयटिसी मिशन सुनहरा कल,अफार्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन आयटिसी मिशन सुनहरा कल चे साई गौतम,प्रकाश वायसे (अध्यक्ष,मिना सिंचन कालवा ),प्रा. तुषार जगताप,सरपंच विक्रम निचीत यांसह मान्यवर उपस्थित होते.
आयटिसी मिशन सुनहरा कल अंतर्गत झालेल्या कामांची माहिती साई गोतम यांनी दिली. तर पाणी वापर संस्था कसे सक्षम होऊन पुढे जातिल या वर प्रकाश वायसे यांनी प्रकाश टाकला. पाणी वापर संस्थेच्या भुमिका व जबाबदार्‍या कोणकोणत्या आहेत,पाणी मागणी अर्ज कसा करावा महाराष्ट शासनांचा पाणी वापर संस्थेला पुरस्कार कसा मिळतो या बद्दल सखोल असे मार्गदर्शन प्रा.तुषार जगताप यांनी केले.जागतिक जल दिन साजरा करण्याचा मुख्य उद्दिष्टे,पाणी हे मानवी जिवनासाठी किती महत्वाचे आहे हे उदाहरणा सहित उपस्थितांना सागर तायडे यांनी पटवुन दिले.आयटिसी मिशन सुनहरा कल व अफार्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गावात झालेल्या कामा बद्दल सरपंच विक्रम निचित यांनी समाधान व्यक्त केले.


या कार्यक्रमात टाकळी हाजी शाखा सिंचन विभाग महाराष्ट शासन यांच्या अंतर्गत येत असलेल्या पाणी वापर संस्थां पैकि ०१)गुरुनाथ पाणी वापर संस्था,वडनेर ०२) कुंडमाऊली पाणी वापर संस्था,माळवाडी ०३) संगमेश्र्वर पाणी वापर संस्था,म्हसे/डोंगरगन या पाणी वापर संस्थांना उत्कुष्ट काम केल्या बद्दल सन्मान चिन्ह देवुन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच जागतिक जल दिना निमित्त सर्व उपस्थितांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शपथ घेतली. या कार्यक्रमाचे सुञसंचालन अफार्म संस्थेचे कृषी विस्तार अधिकारी मनोहर मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन सरपंच विक्रम निचित यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम वादे (प्रकल्प व्यवस्थापक),सागर तायडे (वरीष्ठ अभियंता),संजय शिंदे (कृषी विस्तार अधिकारी),मनोहर मोहिते (कृषी विस्तार अधिकारी),संकेत तायडे(कृषी प्रयवेक्षक),विक्रम पवार (कृषी प्रयवेक्षक) व ग्रामपंचायत कार्यालय,वडनेर यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!