खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
लोकवेध live न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकीच रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणावर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी देशाच्या आवाजासाठी लढा देत आहे, मी कोणतीही किंमत चुकवण्यासाठी तयार आहे, असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारला चॅलेंज केलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ संबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवलं आहे. त्यामुळे हा संसदीय समितीने राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
