संगमनेर प्रतिनिधी —
-संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील ज्ञानगंगा विद्या प्रसारक संस्थेच्या शारदा विद्यालयाने मार्च 2026 मध्ये झालेल्या इयत्ता दहावी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल यावर्षीही 100 टक्के लागला असून 19 वर्षांची परंपरा शारदा विद्यालयाने कायम राखली आहे. शारदा विद्यालयातील श्रद्धा बाळासाहेब बोराडे या विद्यार्थिनीने 88.60 % मिळून येण्याचा बहुमान पटकावलाय. तर दुसरा क्रमांक ज्ञानेश्वरी बाळासाहेब घुले आणि प्रतीक दिलीप बोराडे यांनी 83.20% गुण मिळवले .तर तृतीय क्रमांक पियुष दत्तात्रेय वाकचौरे यांनी 82.40% गुण मिळवले आहे. तर चतुर्थ क्रमांक प्रवीण सुदाम बोराडे याने 80.40% टक्के गुण मिळविले आहेत. शारदा विद्यालयाच्या यशामागे संस्थेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,खजिनदार सर्व संचालक मंडळ शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचा कायम अनुभवी शिक्षक वृंद यांना सहकार्य राहिले आहे. डिजिटल क्लासरूम चा वाटा या यशामध्ये मोठा आहे. शाळेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,मोफत पाठ्यपुस्तके आणि विविध शासकीय योजनांचा लाभ ही दिला जातो .अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही शाळेने आपली नवी ओळख निर्माण केली आहे. शारदा विद्यालयातील सर्व शिक्षक यांचे ज्ञानगंगा विद्या प्रसारक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थानी अभिनंदन केले आहे.
