महामानव डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
अकोले प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोकरी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने दानशूर व्यक्तीमत्त्व यशवंत डोळस यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन तथा दर्जेदार लेखन साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या शैक्षणिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक विकासराव शेटे, कवी ज्ञानेश पुंडे, दत्तात्रय शेटे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठलराव शेटे, कैलासराव पुंडे, ज्ञानेश पुंडे, ऍडव्होकेट सौरभ पुंडे, राजेंद्र पुंडे, विठ्ठलराव शेटे, कविराज भांगरे , कृष्णा भांगरे , माधवराव शेटे, विशाल पुंडे, जालिंदर शेटे यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढोकरी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर भाईक यांनी केले तर सहशिक्षक फक्कड चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
