गगनगिरी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

पिंपरणे प्रतिनिधी :

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 95.45 टक्के लागला. यामध्ये अस्मिता गंगाराम घोडे हिने 81 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृती सुनील नागरे (80.20%), वेदांत राजेंद्र जानेकर (78.20%), हार्दिक रामनाथ भारती (77%), कल्याणी शंकर मस्के (77%), हर्षल अरुण वर्पे (76.40%) तसेच अश्विनी धनंजय पानसरे (75.80%) यांनी विशेष प्राविण्य मिळवले.

इयत्ता बारावी कला शाखेचा निकाल 89.65 टक्के लागला असून संजना लक्ष्मण गोडे हिने 76.50 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. प्रज्वल मनोज साळवे (72%), अदिती राजू पानसरे (68.17%), साक्षी अनिल भादेकर (65.67%) व सागर अजय रोहम (65.33%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून सार्थक विकास शिरसाट याने 75.83 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. अथर्व जयंत देशपांडे (74.50%), गौरी संतोष उपरे (73.17%), पुष्कराज अजय जोर्वेकर (71.67%), स्वामी रमेश पावसे (71.67%) तसेच धनश्री संजय बांबळे (71.17%) यांनीही यश मिळवले.

आयटी विषयात 100 पैकी 99 गुण मिळवणाऱ्या प्रांजल सत्यवान गडगे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विराज दत्तात्रय पवार, निकिता संदीप पानसरे, सत्यम रोहिदास अभंग, वैष्णव जालिंदर गुंजाळ, अपेक्षा दादासाहेब सलालकर व कुणाल बाळासाहेब पानसरे या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव श्री. कैलासशेठ काळे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास संस्थेचे संचालक श्री. वाकचौरे सर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. बागुल सर, उपाध्यक्ष श्री. साळवे सर, सदस्य व माजी प्रशासकीय अधिकारी श्री. पवार साहेब, विद्यालयाचे प्राचार्य श्री. वाळे सर, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. मांढरे मॅडम यांनी पीएचडी अर्थात डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य श्री. वाळे सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. शेळके ललित सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दिलीप डोंगरे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!