खडी क्रेशर वाल्याची दादागिरी ; चक्क उपसरपंचाला जीवे मारण्याची धमकी
मेंढवन येथील उपसंरपच सोमनाथ काशिनाथ बढे यांना क्रेशर बंद केल्याचा राग धरुन खडी क्रेशरवाल्याकडून जिवे मारण्याची धमकी !
संगमनेर : लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथील उपसंरपच सोमनाथ काशिनाथ बढे यांना क्रेशर बंद केल्याचा राग धरुन खडी क्रेशरवाल्याकडून जिवे मारण्याची धमकी ! संगमनेर ग्रामिण पोलिस स्टेशन मध्ये संबंधितावर गुन्हा दाखल !
                                                       सविस्तर माहिती अशी कि , मेंढवन येथील उपसंरपच सोमनाथ काशिनाथ बढे यांना रविवारी सकाळी १० गावातीलचं रमेश साहेबराव काळे , नवनाथ साहेबराव काळे , बाळासाहेब साहेबराव काळे यां खडी क्रेशर चालकांचा फोन आला . ” तु आमचे खडी क्रेशर बंद करण्याकरिता अर्ज करतो म्हणाले ”   त्यावर बढे म्हणाले ” मी अशा प्रकारचा कुठलाही अर्ज केलेला नाही , मात्र त्यांनी माझे कुठलेही ऐकूण न घेता . अर्ज केल्याच्या संशयावरुन सोमनाथ बढे यांना शिवीगाळ करत तु आमच्या नांदी लागू नको , तुला कापून टाकू , मारुन टाकु अश्या धमक्या देवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करुन ये घ्या रे काठ्या ,  कुऱ्हाडी चला त्यांच्या घरी ! असे म्हटल्याने या धमकीमुळे घरातील पत्नी लहान मुले घाबरल्याचे आपल्या तक्रारी अर्जात बढे म्हणाले आहे .
सोमनाथ बढे यांच्या तक्रारी अर्जावरुन संगमनेर ग्रामिण पोलिस स्टेशन मध्ये रमेश काळे , नवनाथ काळे व बाळासाहेब काळे यांच्या वर भा दं सं १८६० नुसार ५०४ , ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नुकतेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी , खडी क्रेशर यांचे अवैदय असणाऱ्या व्यवसायाविरोधात बंदचे हत्यार उपसल्याने बेचैन झालेल वाळु , खडी क्रेशरवाले आता सर्वसामान्य माणसाना दमदाटी देत असल्याचे प्रकार घडून लागल्याचे चित्र दिसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!