हॉर्न का वाजवले म्हणत दोन तरुणांनी एकास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली !
आश्वी खुर्द मधील घटना ! दोघांवर गुन्हा दाखल
संगमनेर : लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील अविनाश साहेबराव सोनवणे यांनी हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने दोघानी त्यांना शिविगाळ करत मारहाण केली.याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अविनाश सोनवणे यांनी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, २६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मी जगताप यांच्याकडे रतिबाचे दूध देण्यासाठी जात होतो. यावेळी आश्वी बुद्रुक येथील बस स्थानकाजवळ गर्दी असल्याने मी हाँर्न वाजवला. त्यामुळे विजय खेमनर (पुर्ण नाव महित नाही, रा. ओझर, ता. संगमनेर) व लखन साहेबराव मदने (रा. आश्वी. बुद्रुक, ता. संगमनेर) हे गाडीजवळ आले व काही कारण नसताना शिविगाळ करत लखन मदने याने माझ्या गाडीचे रिकामे दुधाचे कँन काढून माझ्या पाठीत मारला व विजय खेमनर याने मला लाथाबुक्यानी मारहाण करण्यास सुरवात केली. त्यामुळे भांडण सोडवण्यासाठी त्याठिकाणी आलेले गणपत मारुती जगताप यांनाही या दोघानी जबर मारहाण करत आमच्या नादी लागला तर जिवंत ठेवणार नाही व तुमची गाडी जाळून टाकू अशी धमकी दिली. असे पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत सोनवणे यांनी म्हटले आहे.
