अवकाळी पावसामुळे पिकांची झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करा.

संगमनेर / लोकवेध live न्युज

अवकाळी पावसा मुळे झालेल्या शेतीची लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीब भाई शेख
मागील आठवड्यात अवकाळी पावसाने तालुक्यात विविध भागात चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात बदल होऊन उकाडा वाढला आहे. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या गडगडाटासह तालुक्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अचानक पावसाबरोबर गाराही पडू लागल्या. या गारा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडल्या की काही काळ महामार्गावर स्नो फॉल झाल्यानंतर रस्त्यावर जसे बर्फ साचले होते. गारांचा सडा पुणे- नाशिक महामार्गावर पडला होता. टोमॅटो पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते. याच भागात ही प्रचंड गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाला गारपिटीचा मोठा फटका बसलाय. अचानक वातावरणात बदल होऊन अर्ध्या तासाच्या आत प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गारपिट झाली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागाला या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. यात गहू हरबरा मका, कांदा या सारख्या विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहे. सातत्याने शेतकर्‍यांवर संकटे येत असून यातून शेतकरी सावरत नाही. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करा. व पठार भागातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी संजय फड यांनी केली


अवकाळी पावसाने थैमान घातले उभं असलेलं पीक वाया गेलं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले ,शेतीचे हाल झाले, शेतकरी हवालदील झाला, हातात तोंडापाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावून घेतला, या आसमानी संकताने शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे, मेटाकोटीला आलेला आहे आता या वाईट काळात शेतकरी पुनः उभा करणे ही जबाबदारी सरकारची आहे, अगोदरच शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही शेतीसाठी लागणारे सर्वच साहित्य सामग्री पशुखाद्य सर्वच महागले आहे, बाजारात शेतीमालाला भाव नाही यामुळे शेतकरी अक्षरशा वैतागलेला असताना आठ पंधरा दिवस उलटूनही अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची योग्य ती पंचनामे झालेले नाहीत जर संगमनेर अकोले परिसराचे अधिकारी व संबंधित अधिकारी पंचनामे करण्यास व शेतकरी बांधवांना मदत देण्यास टाळाटाळ करत असतील तर शेतकरी बांधवांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, *शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बबन नाना घोलप यांच्या आदेशाने* संपूर्ण उत्तर नगर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी शिवसेना सज्ज झालेली आहे पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे पाटीलअकोले तालुका प्रमुख dr मनोज मोरे उपजिल्हा प्रमुख महेश नवले राजूर भाग तालुका प्रमुख मुर्तडक यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर प्रांत अधिकारी मंगरुळे साहेब यांना29/3/2023रोजी शिवसेना संगमनेर च्या वतीने निवेदन देण्यात आले व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी मागणी करण्यात आली यावेळी उपनगर जिल्हा प्रमुख मुजीब शेख, पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे ,अकोले तालुकाप्रमुख डॉक्टर मनोज मोरे, माधवराव तीटमे, शहर प्रमुख नितीन नाईकवाडी ,सौरभ चौधरी, ओंकार सावंत, राम एखंडे ,संगमनेर शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे, सदाशिव हासे,, बाळासाहेब कवडे, उप शहर प्रमुख दीपक वनम शहर समन्वयक असिफ तांबोळी, युवा सेनेचे अक्षय गाडे, माधव फुल माळी, युवा सेनेचे शोएब शेख ,युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण ,शहर कार्याध्यक्ष दीपक जी साळुंखे ,रंगनाथ फटांगरे खालील पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!