संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथील नवसाला पावणारी जाखुआई देवी यात्रा उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात पार पाडला यात्रा उत्सवा निमित्त यावर्षी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले मंगळवार दिनांक 28 रोजी सकाळी देवीला गंगा स्नान घालुन महाआरती करण्यात आली
परंपरेनुसार हनुमान मंदिर येथून शेंद्राची काठी ध्वज शेंदूर गावात मिरवत आणून देवीला शेंदूर लावण्याची परंपरा आहे त्यानुसार देवीला शेंदूर लावण्यात आला आणि यात्रेला सुरुवात झाली भाविकांनी सकाळपासून दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती तर काहींनी आपली नवसपूर्ती केले सायंकाळी देवीचा छबिना चोळी पातळ व काठीची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर सामूहिक देवीची
आरती घेण्यात आली त्यानंतर आकर्षक फटाक्यांची आतिशबाजी चा कार्यक्रम झाला
यात्रेनिमित्त जाखुआई मंदिरावर तसेच गावातील सर्व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती रात्री संध्या माने सह रोहन माने यांचा लोकनाट्य मनोरंजनाचा कार्यक्रम झाला बुधवार दिनांक 29 रोजी सकाळी हजऱ्यांचा कार्यक्रम होऊन सायंकाळी चार वाजता
कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला यावेळी तालुक्यातून विविध ठिकाणच्या मल्लांनी आपली ताकद आजमावली यात्रा यशस्वी करण्यासाठी जाखुआई देवस्थान ट्रस्ट, जाखुआई यात्रा कमिटी,सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील गावातील विविध संस्था , तसेच तरुणांनी विशेष परिश्रम घेतले