अंभोरे गाव झाले अवघे प्रती पंढरपुर !                                                                                                       संगमनेर : लोकवेध live न्यूज
जे का रंजिले गांजिले त्यासी म्हणे जे अपुले! तोचि साधू ओळखावा देव तेथीची जाणावा!.. या उक्तीप्रमाणे श्री.क्षेत्र अंभोरे येथे विठ्ठल रुख्मिणी मंदीर प्रांगणात पुर्वापार चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहाची स्थापना गुरुवार दि.23/03/2023 रोजी संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांचे शुभ हस्ते विधिवत पुजा करुन संपन्न झाली.

सप्ताहाचे निमित्ताने विठ्ठल रुख्मिणी मंदीराची विद्युत रोषनाईने उत्कृष्ठ सजावट करण्यात आली त्यामूळे मंदीर परिसरात विद्युत प्रकाशा मुळे संपूर्ण विजेचा झगमगाट दीप उजळतांनी दिसत होते.उत्कृष्ठ मंडप डेकोरेटर्स करण्यात आले.

सप्ताहाचे पहिले पुष्प रणखांब येथिल ह.भ.प.दिपक महाराज गुळ्वे यांनी गुफले.सप्ताहाचे दुसरे पुष्प चिंचपुर ता.संगमनेर येथिल ह.भ.प.बाबासाहेब मगर महाराज यांनी गुंफले त्याच दिवशी गावातील तरुण युवकांनी अन्नदान पंगत दिली तिसरे पुष्प राहुरी येथिल प्रसिध्द कीर्तनकार विनोदाचार्य ह.भ.प.अमोल महाराज पिसे यांनी गुंफले.त्याच दिवशी लक्ष्मण बुवा महाराज खेमनर (अंभोरे)इगतपुरी युवक मंडळ अंभोरे यांनी अन्नदान पंगत दिली .चवथ्या दिवशी अंभोरे येथिल भुमिपुत्र महान संत लक्ष्मण महाराज इगतपुरी यांचे शिष्य शिवुर येथिल ह.भ.प.तुपे महाराज यांनी पुष्प गुंफले दिवशी त्याचा गावातील रणजित दादा देशमुख मित्र मंडाळाचे वतीने अन्नदान पंगत दिली.पाचव्या दिवसाचे पुष्प संगमनेर येथिल किसनगिरी महाराज हारदे या मठाचे मठाधिपती बालब्रम्हचारी ह.भ.प.माऊली महाराज यांनी गुंफले सुरूनाथ बाबा मित्र मंडळाचे वतीने अन्नदान पगंत दिली.सहाव्या दिवशी बीड येथिल ह.भ.प.विठ्ठल महाराज शिंदे यांनी पुष्प गुंफले त्या दिवशी अंभोरे गावचे शिक्षक,व्यापारी असोसिएशन,आणी त्यांचे सहकारी मित्र यांनी पंगत दिली.सातव्या दिवशी पुष्प नादुर्खी ता.राहता येथिल ह.भ.प.यांनी गुंफले त्या दिवशी अंभोरे गावचे भूमिपुत्र संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन सन्माननीय रणजितसिंह देशमुख साहेब यांनी अन्नदान पंगत दिली

सप्ताहाचा आठव्या दिवशी आज शुक्रवार दि.31/03/2023 रोजी सांगता काल्याचे कीर्तन सेवा चिंचवड येथिल ह.भ.प.राजेश्वेरीगिरी महाराज यांनी केली.उपजोनी या पुढती येवू!काला खाऊनही दही भात!वैंकुंठीत ऐसे नाही,काळ काही काल्याचे,एकमेंका देऊ मुखी सुखी घालू उंबरी!
तुका म्हणे वाळवंट,बरवे हिता उत्तम! श्री संत जगद्गुरु विश्वश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे प्रमाण देऊन ग्रामस्थ,महिला,भावीक सर्व या कीर्तनात अगदी तल्लीन होऊन गेले काल्याचे कीर्तन प्रसंगी मनुष्याला चांगले जिवन जगायचे असेल तर अहंकार सोडला पाहिजे.अहंकार हा माणसाचा खुप मोठा शत्रु आहे.काहींना बुध्दिचा,पैशाचा,श्रीमंतिचा अहंकार असतो तो काही कामाचा नाही.हे आपण सर्वांनी कोरोना काळात बघितले आहे.एअर कंडीक्शण बंगल्यात राहणा-यांना सुध्दा सोडले नाही.तर आपण खुप लहान आहोत.पैशावाल्याकडे एवढा प्रचंड पैसा असुन सुध्दा कहीच उपयोग झाला नाही मुलं देखील अंतीम संस्कारही करू शकले नाही तर त्या मुलांचा काय उपयोग?कोरोना काळात जे नको ते खाणे,जे नको ते पिणे,मांस,अंडी,हा आहार घेतला तरी मृत्यु आला परंतू ज्यांनी परमार्थ केला परमेश्वरचि आराधना,देवाचे नामस्मरण करतात त्यांनी कोरोनालाही अर्थात मृत्युला परतून लावले एवढी मोठी शक्ती या अध्यात्मात आहे.रस्त्यावरचा भिकारी हा कोरोनात भक्कम राहिला परंतू बंगल्यात गादीवर आराम करणाराला मृत्यु आला म्हणून अपल्या गावातील खुप महान संत झाले त्यांचे राज्य आणी राज्याबाहेर किर्ती पोहचली आहे एवढे तुम्ही भाग्यवान आहात या संताचे विचार आपण सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ!या प्रमाणे प्रत्येकास मदत करा,तहानलेल्यास पाणी,भुकेल्यांना आन्न,एखादयास आपण आपले जुने कपडे देऊन मदत करा.त्यांचे समधान होईल.

सप्ताह काळात संपूर्ण गाव दररोज काकडा,भजन,हरीपाठ,आणी कीर्तन यांमुळे संत तुकाराम,संत ज्ञानोबा,संत,एकनाथ,संत लक्ष्मण बुवा महाराज,ज्ञानोबा माऊली तुकाराम!अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.दररोज टाळ मृदंगाच्या गजरात संताची
अभंगवाणी ,भजन यामुळे गावात आनंदाचे वातवरण निर्माण झाले.वाडी,वस्तीवरील गावातील संपूर्ण ग्रामस्त
महिला,तरुण,युवक,युवती,हजारो भावीक उपस्थित राहत असे कीर्तन संपल्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात येत.दररोज एक पंगतीसाठी एक ते दीड लाख रुपये खर्च येत तो खर्च युवक,तरुण स्वता:वर्षभर आपण कष्टाने कमविलेला पैशातून काही पैसे या अन्नदान चांगल्या कामासाठी आपले सर्व मित्र एकत्र करुन देत आणी अन्नदान करित असे सप्ताह काळात सातही दिवस अन्नदानाचे कार्य अखेर पर्यंत चालू होते.

सप्ताह यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण,युवक,ग्रामस्थ,महिला,परिसरातील वारकरी संप्रदाय,अंभोरे गावातील भजनी मंडळ,पहारेकरी,गायक,मृदूंगाचार्य,पेटी वादक,सप्ताह कमेटी श्री.रावजी भागा,श्री.सोपान राधू खेमनर,श्री.रावसाहेब रावजी खेमनर,श्री.लहाणु भिमाजी खेमनर,श्री.बबन सुभा खेमनर,श्री.बाबुराव जगनर,श्री.रेवजी अंदु खेमनर,श्री.भाऊसाहेब रखमा खेमनर,श्री.बाबुराव नामदेव खेमनर श्री.चिमा भागा खेमनर,श्री.शिवराम सखाराम खेमनर,श्री.संपत गोविंद खेमनर,श्री.सहादु दामू खेमनर,केरु सावळेराम वाघमोडे,श्री.शिवाजी गंगाधर खेमनर,श्री.विठ्ठल नामदेव खेमनर ,ज्ञानदेव येसू खेमनर,विठोबा जाणकु खेमनर,कैलास खंड़ु कडनर , ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य,कर्मचारी,सोसायटी चेअरमन सर्व सदस्य,दुध संस्थेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन सर्व सदस्य,कर्मचारी,मल्हारराव होळकर विद्यालयाचे शिक्षक,विविध संघटना,भक्त परिवारांचे या बरोबरच आजी,माजी,पदाधिकारी ,जेष्ठ ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. तरुण,युवक मित्रांनी सप्ताह काळात प्रसाद वितरणाचे काम उत्कृष्ठ केले त्यामुळे सप्ताह करणे सहज शक्य झाले.सप्ताहात हजारो भाविक,ग्रामस्थ,महिला,यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मा.महसूल मंत्री,मा.आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी सप्ताहास भेट देऊन सप्ताह कमेटीचे उत्कृष्ठ नियोजन बघुन मा.रणजितसिंह देशमुख,आणी सप्ताह कमेटीचे कौतुक केले आणी शुभेच्छा दिल्या.

विशेष सहकार्य मा.सरपंच भास्करराव खेमनर,संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन सन्माननीय रणजितसिंह देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आणी उत्कृष्ठ नियोजन यामुळे सप्ताह संपन्न झाला त्यांचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले.सप्ताहाचे संपूर्ण सातही दिवस सुत्र संचालन श्री.सुभाषराव हळ्नोर यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!