तालुक्याचा हिताच्या व विकासाच्या आड येणाऱ्यांना धडा शिकवा- आमदार बाळासाहेब थोरात

दहशत व चुकीचे वातावरण संगमनेर तालुक्यात येऊ द्यायचे नाही

चंदनापुरी येथे भव्य मेळाव्यात तालुक्यातील मतदार एकवटले

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर बाजार समितीने अत्यंत चांगले काम केले असून विविध ठिकाणी उपबाजार सुरू केले आहेत. आगामी काळात संगमनेरात मोठे डाळिंब व कांदा मार्केट होणार असून बाजार समितीची ही निवडणूक काही लोकांनी विनाकारण लादली आहे. तिकडचे दहशतीचे व चुकीचे वातावरण आपल्या तालुक्यात येऊ द्यायचे नसून तालुक्याच्या हिताच्या व विकासाच्या आड येणाऱ्यांना या निवडणुकीतून धडा शिकवा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

चंदनापुरी येथे शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ व मतदार मेळाव्यात ते बोलत होते .यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बबनराव घोलप, मा. आ. डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड. माधवराव कानवडे ,सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात ,रणजीतसिंह देशमुख, लहानुभाऊ पा. गुंजाळ, आर बी राहणे, इंद्रजीत भाऊ थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शिवसेनेचे अमर कातारी ,संजय फड बाबासाहेब ओहोळ, मिलिंद कानवडे, अजय फटांगरे ,महेंद्र गोडगे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, शंकर पा. खेमनर, गणपतराव सांगळे, सुधाकर जोशी, विजय राहणे, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी असून अनेक दिवस काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी मिळाली आहे. संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था व बाजार समिती ही राज्यात अग्रगण्य आहे. येथील चांगले वातावरण, विकासाची वाटचाल यामुळे तालुक्याचा सर्वत्र लौकिक होतो आहे. मात्र हे काही लोकांना पहावत नाही. त्यामुळे येथील सहकारी संस्था मोडीत काढण्यासाठी ते अडथळे निर्माण करत आहेत.

राज्यात सर्वाधिक महसूल मंत्री पद भूषवताना आपण सर्वसामान्य जनतेची कामे केली. जास्तीत जास्त विकासाच्या योजना राबवल्या. कधीही कुणाचे वाईट केले नाही. सुसंस्कृत राजकारण ही आपली परंपरा असून विकासात कधीही भेदभाव केला नाही .तालुक्यातील निमगाव जाळी ,कोल्हेवाडी यांसह सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी आपण मोठा निधी मिळवला. मात्र ज्यांचा काही संबंध नाही ते विद्यमान सरकारमधील मंत्री मागील योजनांच्या निधीवर स्वतःचे फोटो लावण्यासाठी आग्रही आहेत.

निळवंडेच्या कालव्यांचे कामे आपल्या काळात रात्रंदिवस सुरू होती. ऑक्टोबर 2022 मध्येच पाणी द्यायचे होते . सरकार बदलल्याने सध्या डाव्या कालव्याचे काम अत्यंत मंदावले आहे .तर उजव्या कालव्याचे काम सध्या बंदच आहे.

काही खबरे चुकीच्या माहिती त्यांना देत असून दबाव टाकून विविध कार्यकर्त्यांवर खोटे-नाट्या केसेस दाखल करून दहशतीचे वातावरण निर्माण करू पाहत आहेत .हे दहशतीचे व चुकीचे वातावरण आपल्याला इकडे येऊ द्यायचे नाही.

राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण असून बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वांनी आपल्यातील मतभेद विसरून एकत्र येत तालुक्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहनही त्यांनी केले आहे

तर माजी मंत्री बबनराव घोलप म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील ही बाजार समिती राज्यासाठी आदर्शवत आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असून विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे. राहता तालुक्यामधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठे यश मिळणार असून संगमनेर तालुक्यातील विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन ही त्यांनी केले

तर आ.सत्यजित तांबे म्हणाले की ,संगमनेरच्या सहकार हा राज्यात आदर्शवत असून विरोधकांनी विनाकारण ही निवडणूक लादली आहे. या निवडणुकीत त्यांना चांगला धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले तर
मा.आ.डॉ तांबे म्हणाले की, संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल असून चांगल्या कामात खोडा घालण्याचे राजकारण काही मंडळी करू पाहत आहे. मात्र संगमनेर मध्ये त्यांचा डाव यशस्वी होणार नाही असा विश्वास व्यक्त केला

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेरच्या सर्व सहकारी संस्थांना चांगल्या कामाची मोठी परंपरा असून या निवडणुकीतही सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील यावेळी सुरेश कान्होरे, सतीश खताळ, गीताराम गायकवाड, मनीष गोपाळे, कैलास पानसरे, विजय सातपुते, सौ दिपाली वर्पे ,सौ रुक्मिणी साकुरे ,सुधाकर ताजने ,अनिल घुगे, अरुण वाघ , सखाराम शरमाळे, मनसुख भंडारी, महेंद्र गुंजाळ, संजय खरात ,निलेश कडलग, निसार शेख आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर पा. खेमनर यांनी केले सूत्रसंचालन मिलिंद कानवडे व नामदेव कहांडळ तर बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले

खबऱ्यांचा बंदोबस्त मतदार करतील

स्वतःच्या फायद्यासाठी अनेक खबरे संगमनेर तालुक्यात काम करत असून या निवडणुकीमध्ये सर्व खबऱ्यांचा बंदोबस्त तालुक्यातील मतदार करतील असा विश्वास आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!