सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत तार अंगावर पडल्याने 7 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू !
संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी येथे घडली घटना
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
सोसाट्याच्या वादळी वार्‍याने  विद्युत तार  तुटून अंगावर पडल्याने सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना संगमनेर  तालुक्यातील चंदनापुरी  येथे गुरुवार (दि.४)  रोजी दुपारी  दोन वाजेच्या सुमारास घडली. अजित गोकुळ मेंगाळ असे मृत्यू झालेल्या बालकांचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, चंदनापुरी येथे माधव शंकर राहाणे हे राहात असून वेल्हाळे येथील गोकुळ मेंगाळ हे त्यांची शेती वाट्याने करत आहे. गुरूवारी दुपारी मेंगाळ यांचा मुलगा अजित हा राहणे यांच्या घराच्या पाठीमागे खेळत होता. त्याच दरम्यान  पावसाच्या सरीसह  जोरदार वादळी वारेही  सुरू झाले. त्याच वेळी सुरू असलेल्या वादळी वार्‍याने  विजवाहक तार तुटून थेट अजित याच्या अंगावर पडली. शेजारीच असलेल्या काहींनी हे दृश्य पाहीले आणि जोरजोराने आरडा ओरड केली.
काय झाले म्हणून पाहण्यासाठी अनेकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. घटनेची माहिती समजताच वायरमन गोकुळ कतारी, मनोज नेहे यांनीही रोहित्राच्या दिशेने धाव घेत प्रथम रोहित्र बंद केले. त्यानंतर विजवाहक तार बाजूला घेण्यात आली. लगेच अजित या चिमुकल्याला औषधोपचारांसाठी घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात  नेले होते. मात्र औषधोपचारापूर्वीच त्याचा मृत्यू  झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान अजित गोकुळ मेंगाळ या सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
महावितरणचे हिवरगाव पावसा सबस्टेशन
सहाय्यक अभियंता बेदरकर साहेब यांनी घटनास्थळाला भेट दिली सर्व माहिती जाणून घेऊन घडलेल्या घटनेची वरिष्ठांना माहीती दिली व महावितरणाकडून शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!