भरधाव टेंपोने चौघांना उडवले ; एक ठार , तीघे गंभीर जखमी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापूरी घाट परीसरात टेंपोचालकाने दोन दुचाकीवरील चौघांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना सोमवार दिनांक १ मे रोजी सकाळी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे. तर या अपघातात पोखरी बाळेश्वर येथील शुभम दादाभाऊ फटांगरे हा युवक ठार झाला आहे.
याबाबत महामार्ग पोलिसांनी माहिती अशी की, अरविंद कुमार यादव( राहणार युपी) हा त्याच्या ताब्यातील टेंपो क्रमांक एम एच ४७ ए एस २७६१ हा घेऊन आळेफाट्याकडून संगमनेरच्या दिशेने चालला होता. सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान तो चंदनापूरी घाट परीसरातील हॉटेल साईप्रसाद समोर आला असता महामार्गावर चाललेल्या एम एच १७ ए वाय ६६३० व एम एच १७ सी डब्ल्यू ३७८१ या दोन दुचाकींना त्याने जोरदार धडक दिली त्यात शुभम दादाभाऊ फटांगरे (वय २३ ) रा पोखरी बाळेश्वर तालुका संगमनेर हा युवक ठार झाला तर महेश्र्वरी बाळासाहेब अग्रे (वय २३) राहणार लोणी जिल्हा अहमदनगर दादाभाऊ भाऊसाहेब फटांगरे रा पोखरी बाळेश्वर तालुका संगमनेर, अमोल नालकर ( वय २५) राहणार लोणी जिल्हा अहमदनगर हे गंभीर जखमी झाले आहेत.

तर टेंपो महामार्गावर पलटी होऊन चालक अरविंद कुमार यादव किरकोळ जखमी झाला आहे.दरम्यान घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलिस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ पुजारी, नारायण ढोकरे,भारत गांजवे, घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, नामदेव बीरे, अनिल भांगरे आदिंनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.दरम्यान टेंपो चालक संगमनेरच्या दिशेने जात असताना घारगांव बस स्थानक परिसरातूनही भरधाव वेगाने चालला होता. कार व पायी प्रवाश्यांनाही त्याने जोराची हुलकावणी दिली केवळ दैव बलवत्तर असल्याने हा अपघात झाला नाही.असे चर्चिले जात होते.
