लोकशाहीच्या रक्षणासाठी देशात व राज्यात काँग्रेसच्या सरकारची गरज – काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात
कर्नाटक मधून देशभरात परिवर्तनाची सुरुवात
कर्नाटक मधून भाजपची घसरण सुरू
संगमनेर मध्ये कर्नाटक विजयाचा जल्लोष
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
कर्नाटक मधील विजय हा मोठा असून तो जनतेचा विजय आहे. भाजपने सुरू केलेले दहशतीचे आणि जातीभेदाचे राजकारण हे भारतीय नागरिकांना मान्य नसून कर्नाटक विधानसभा निकालाने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी देशात व राज्यात काँग्रेसच्या सरकारची गरज असून भाजपाची आता घसरण सुरू झाली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे .
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाचा आनंद संगमनेर मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषात  साजरा केला. यावेळी समवेत आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक,निखिल पापडेजा, सुभाष सांगळे, गौरव डोंगरे, जयराम ढेरंगे, किशोर टोकसे, अर्चनाताई बाकोडे आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या विजयानंतर बोलताना काँग्रेस नेते आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या विकासाचा व लोकशाहीवर  विश्वास असणारा पक्ष आहे. 2014 मध्ये भुलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राजकारणासाठी स्वायत्त संस्थांचा वापर केला आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढलेले असताना धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहे .भाजपाची कार्यपद्धती ही दहशतीची आणि द्वेषाची असून समाजा समाजात तेढ निर्माण करत आहे. यामुळे भारतातील नागरिक बंधू-भगिनी हे अस्वस्थ आहेत .

जनतेमधील ही अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 3560 किमी ची केलेली भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरली आहे .या यात्रेतून हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक मध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता उभी राहिली आहे.जनतेचा काँग्रेसवर मोठा विश्वास असून आगामी काळात देशात व राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार आहे. लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी ,देशाचा विकास घडवण्यासाठी, स्वायत्त संस्थांना पुन्हा स्वायत्तता देण्यासाठी काँग्रेस पक्ष हा अत्यंत गरजेचा
आहे.महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असून देशात मोठी परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून देशात व महाराष्ट्रातही परिवर्तन नक्की होणार असल्याचे आमदार थोरात यांनी म्हटले आहे.यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजर ,फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण करून काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!