छत्रपती संभाजी राजांच्या जयंतीदिनी डॉ. नंदकुमार गोडगेंकडून गुणवंत विद्यार्थ्यांच गौरव..!!
तळेगाव दिघे / लोकवेध live न्यूज
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ नंदकुमार गोडगे मित्र परिवाराच्या वतीने तळेगाव परिसरातील नुकत्याच पोलीस दलामध्ये निवड झालेल्या तसेच पहिली ते दहावीपर्यंत शिष्यवृत्ती मध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तळेगाव दिघे येथे साजरा करण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनाचा संघर्ष समोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावं .तळेगाव दिघे सारख्या दुष्काळी भागामध्ये शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखे आहे छत्रपती संभाजी महाराजांचे आचार विचार जीवनामध्ये अवलंबल्यास आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ असे प्रतिपादन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकुमार गोडगे यांनी बोलताना केले. यानिमित्ताने पुरस्कारती विद्यार्थ्यांना फेटा, गुलाब पुष्प व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . विद्यार्थ्यांना आपल्या पाठीवर कुणीतरी कौतुकाची थाप टाकत गुणगौरव केल्याबद्दल चेहऱ्यावर हसू म्हटले उमटले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पिंगळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक जगताप सर यांनी केले ,याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होता.
