घटस्फोटासाठी शेवटची सही करायची पण विचार बदलले ; प्रेम जुळून पुन्हा संसार करायचा ठरले
लोकवेध live न्यूज
हल्ली घटस्फोटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. घटस्फोट होताना बहुतांशी जोडप्यांचे संबंध प्रचंड ताणलेले असतात. एकमेकांचे तोंडही त्यांना पाहायचे नसते. अशा वातावरणात एक चांगली बातमी हाती आली आहे. घटस्फोट घ्यायला गेलेलं जोडपं पुन्हा प्रेमात पडण्याची घटना घडली असून घटस्फोटाची शेवटची सही करण्याच्या पूर्वी हसत हसत ते कोर्टाच्या बाहेर पडले.
ही घटना आहे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील. येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये गोपालगंजमध्ये राहाणाऱ्या सोनु शर्मा आणि त्याची पत्नी वर्षा शर्मा यांच्यात घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. त्यांचा कोरोनाच्या वेळी छोट्या- छोट्या गोष्टींवरून वाद झाला होता. त्यामुळे वर्षा रागाच्या भरात माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून ते वेगळे राहात होते. वर्षभरापूर्वी त्यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली होती. त्याची सुनावणी झाल्यानंतर पोटगीची रक्कमही ठरली होती. कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अतुल खंडेलवाल यांची यात मोलाची भूमिका ठरली. त्यांनी प्रथम दोघा पती- पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी ऐकले नाही. म्हणून त्यांनी या दोघांच्या वडिलांना न्यायालयात बोलावले. वर्षा वडिलांसोबत न्यायालयात आली होती. न्यायाधीशांनी तीला सासरच्या घरी पाठवले. त्यानंतर प्रकरण सामंजस्याकडे वळले आणि नंतर दोघे पुन्हा एकत्र आले. त्यांचे जून २०१७ मध्ये लग्न झाले होते.
हे हि वाचा – एसटी चालक म्हणतोय गौतमी पाटीलचा गावात कार्यक्रम, २ दिवस रजा द्या
यापुढे आमच्यात कधीही गैरसमज निर्माण होऊ देणार नाही, अशी शपथ घेऊन हे पती-पत्नी हसत हसत कोर्टातून बाहेर पडले व आपल्या घरी निघून गेले. तुम्हीही असे गैरसमज होऊ देऊ नका, याचे फार वाईट परिणाम होतात, आपसात सुसंवाद निर्माण करा, असा संदेश या जोडप्याने दिला आहे.
या प्रकरणाची समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. त्यांचा एकमेकांना हार घालून न्यायालयातून हसत बाहेर येण्याचा व्हीडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी न्यायाधीश खंडेलवाल यांचे कौतुक केले असून त्यांना अनेकांनी धन्यवाद दिले आहेत.
