म्हैसवळण घाट  प्रवाशांसाठी साक्षात यमदूत ;
घाट रस्त्यावरील खड्डे व पडलेल्या संरक्षण भिंती मुळे अनेकांचे जीव धोक्यात
  
अकोले / लोकवेध live न्यूज / संजय महानोर
 अकोले सिन्नर तालुक्याच्या क्षेत्रात येणाऱ्या सिन्नर-ठाणगाव ते घोटी जाणारा म्हैसवळण घाट हा अतिशय खराब झाला असून खड्यात रस्ते असा प्रकार झालेला आहे. ठिक-ठिकाणी संरक्षण भित  पूर्णतः तुटून रस्ता खचला आहे. पावसाळ्याबरोबरच  उन्हाळ्यात या वर्षी खूप रस्ता खराब झाला आहे.प्रामुख्याने या रस्त्यावर ठाणगाव मार्गे विश्रामगड हा रस्ता पर्यटनासाठी महत्वाचा मानला जातो. तोच रोड पुढे टाकेद या सर्वतीर्थक्षेत्र या ठिकाणी येतो आणि नंतर घोटी वरून मुंबई कडे जातो आणि मुंबई लोकलमध्ये येणारे प्रवाशी देखील याचं रस्त्यानी  जात येत असतात .
केळी,खिरविरे, सांगावी टाहाकरी,समशेरपूर,देवठाण,पाडळी या बाजारपेठेच्या गावासाठी भाजीपाला हा घोटी मार्केट या ठिकाणी विकण्यासाठी हाच जवळचा मार्ग आहे.हा रोड नगर -नाशिक जिल्ह्यातील हद्दीवरआल्यामुळे नेहमी हा रोड दुर्लक्षित असतो.मागील वर्षी ह्याच रोडला भूस्खलन झाले होते त्याचे काम अजूनही काम झालेले नाही.
या वर्षी  अवकाळी पावसामुळे हा रोड अतिशय खराब झाला आहे खड्डयांमुळे अपघात होतात , लोक जखमी होतात आणि कधी कधी काही लोक जीव गमावतात , त्याला जबाबदार कोण असणार आहे.या परिसरात रहिवाशी असलेले नागरिक  या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापरतात.  एस एम बी टी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी खूप वेळ लागतो या मुळे एखादे पेशंट दगावण्याची शक्यता जास्त असते. हे सुमारे दहा किलोमीटर अंतर पार पाडण्यासाठी एकूण पंचेचाळीस मिनिटे लागतात.  हा रोड आता किती जणांच्या  मृत्यूला कारणीभूत ठरणार आहे हे काळच ठरविणार आहे.अर्थात त्याची आपण वाट पहायची का असा सवाल आहे. हा रस्ता  प्रामुख्याने सिन्नर व अकोले विधानसभा मतदार संघात येतो  लोक नक्की कोणाकडे मागणी कारणार हा एक प्रश्न उपस्थित झाला आहे .या खड्डयामुळे इंधन आणि वेळ जास्त लागतो आणि गाडी खराब होते ह्याला जबाबदार कोण ?अनेक प्रश्न नागरिकांना पडलेलेआहेत.या मुळे या रोड साठी लोकप्रतिनिधीनी लक्ष घालावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.त्यासाठी
 स्वराज संघटनेचे प्रवक्ते योगेश शिंदे व जनसेवा सेवाभावी संस्था ठाणगाव चे अध्यक्ष रामदास भोर हे हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार सिन्नरच्या व अकोल्याच्या आमदारांची घेणार भेट  घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!