नऊ वर्षाच्या मुलीवर नराधमाने केला अत्याचार..! संगमनेर तालुक्यातील घटना , आरोपीला तात्काळ अटक
लग्न समारंभातील हळदीच्या दिवशी घडला घाणेरडा प्रकार ;
संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली घटना
संगमनेर / लोक वेध live न्यूज
९ वर्षाच्या चिमुरडीला शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी परिसरात घडली आहे. मुलीस जेव्हा त्रास होऊ लागला तेव्हा चौकशी केली आणि या घटनेतील सत्य उजेडात आले. याप्रकरणी रमेश जयराम सांगळे (रा. सोनेवाडी, ता. संगमनेर, जि. अ. नगर) या नराधमावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक देविदास दुमने यांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर घटना अशी की सानवाडा पारसरात एका तरुणाचा विवाह होता.
त्यासाठी काही पाहुणे मुंबईहून गावाकडे आले होते. दि. १५ मे २०१३ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हाळदीला सुरूवात झाली होती. तेव्हा पीडित चिमुरडी ही आपल्या आईसोबत बसली होती. हाळद सुरू होती, गावातील मुले गाण्यावर नाचत होत्या त्यामुळे कार्यक्रम चांगलाच रंगत आला होता. तेव्हा अचानक पीडित मुलगी तिच्या आईजवळून उठली आणि बाजुला गेली. अर्थात लघुशंकेसाठी गेलेल्या पीडितेवर रमेश सांगळे या नराधमाचा डोळा होता. तो लागलीच तिच्या मागेमागे गेला.
दरम्यान, पीडित बालिकेला त्याने हाताशी धरले व चल तुझ्या आजी बाबाकडे नेतो त्यामुळे पीडित मुलगी या नराधमासोबत निघाली. मात्र, याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेतला आणि थेट अंधार गाठला. तेथे गेल्यानंतर या नालायक मानसाने तिच्याशी अंगलट करण्यास सुरूवात केली. या नराधमातील दैत्य जेव्हा शांत झाला तेव्हा त्याने या बालिकेला पुन्हा मंडपात आणून सोडले.
दरम्यान, बराच वेळ झाला तरी लवकर आली नाही, कुठे बसली होती? असे आईने विचारले. तेव्हा ही चिमुरडी प्रचंड घाबरलेली होती. तिच्या अंगाचा थरकाप सुटला होता. त्यावेळी आईने तिला धिर दिला. ही अशी का करते आहे? म्हणून आजी आणि अन्य नातेवाईक यांनी विचारले असता ही चिमुरडी बोलती झाली. त्यानंतर तिने सांगितले. की, आरोपी रमेश सांगळे याने तिला एका शेतात नेले होते. तेथे तो काय-काय बोलला आणि काय-काय केले हे सांगितले. तर तिला काय त्रास होतोय हे देखील कथन केले. त्यानंतर घडलेला प्रकार सर्वांच्या लक्षात आला. ही घटना इतकी गंभीर आणि अशोभनिय होती. की, ती एकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यातून पाणी आले. त्यानंतर या नराधमास कोणत्याही प्रकारे अभय न देता त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी रमेश सांगळे याला अटकमंगळवारी दुपारी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने आरोपी रमेश सांगळे याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड विधान कलम 376 (अ, ब), 376 (2) (F) सह बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 चे कलम 4, 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करून तातडीने आरोपीला अटक केली.पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे स्वतः तपास करत आहे.
