मेंढपाळाची पोरगी फौजदार झाली ; डॉ. नंदकुमार गोडगे यांनी केला माय लेकरांचा सत्कार
तळेगाव दिघे = लोकवेध live न्यूज
तळेगाव दिघे येथील मेंढपाळ श्री कुंडलिक कांदळकर यांची मुलगी कु. हर्षदा हिची मुंबई पोलीस नायगाव कॉन्स्टेबलपदी निवड झाली. कुंडलिक कांदळकर हे मेंढपाळ व्यावसाय करतात. अपार कष्ट , मेहनत व दारिद्र्य हे आपल्या पाचीलाच पुजलेलं, पण आपल्यासारखी आपल्या मुलांची हाल होऊ नये त्यांनी शिकून मोठ व्हावं ही वडिलांची अपेक्षा. घरी कोणीही शिक्षित नसताना, पैशाची जेमतेम परिस्थिती असताना आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हर्षदाने जिद्दीने पोलीस कॉन्स्टेबलची परीक्षा उत्तीर्ण केली व आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले. तळेगाव दिघे येथील डॉ. नंदकुमार गोडगे मित्र मंडळाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित केला होता सूत्रसंचालन दीपक पाचोरे यांनी केले तर आभार नितीन दिघे यांनी मानले
