रात्रीचे मोबाईल टॉवरवर पाखर पकडणं पडलं महागात ; दारू पिऊन टॉवरवर चढलेल्या तरुणाचा टॉवरवरून पडून मृत्यू
संगमनेर : लोकवेध live न्यूज
 रात्रीचे बंद मोबाईल टॉवरवर विविध प्रकारचे पक्षी आराम करत असतात त्यांना पकडण्यासाठी रविवारी रात्री अंदाजे एक दीडच्या सुमारास गणेश गवळी दारूच्या नशेत मोबाईल टॉवर वर चढला परंतु टॉवरवर जास्त उंचीवर गेल्यानंतर तोल न सांभाळता आल्याने या तरुणाचा टॉवरवरून पडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे घडली. गणेश भास्कर गवळी राहणार अंभोरे( साधारण वय 27) असे मृताचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गणेश गवळी हा युवक लहानपणापासूनच अंभोरे येथे त्याचा मेव्हणा काळू बर्डे यांच्याकडे राहत होता लग्नानंतरही गणेश पत्नी दोन मुली सह येथेच राहत होता. रात्री शेजारी वरात होती त्यामुळे त्या ठिकाणी दारू पिल्याचे समजते पिऊन तो दारूच्या नशेत पाखर पकडण्यासाठी गावातील बंद असलेला मोबाईल टॉवरवर चढला प्रमाणापेक्षा जास्त उंचीवर  गेल्यानंतर तोल न सांभाळता आल्यामुळे तो खाली कोसळला खाली येत असताना टॉवरच्या मध्यभागी लोखंडी अँगल ला लटकला सकाळी गावातील टॉवर शेजारील लोकांनी पाहिले असता पोलीस पाटील विनोद साळवे यांना सविस्तर माहिती सांगितली
पोलीस पाटील यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन बघितल्यानंतर सदर व्यक्ती मृत झाले असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती देऊन सदर मृत्यू देह तपासणीसाठी संगमनेर कॉटेज हॉस्पिटल ला पाठविला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!