अंबाजोगाई जवळ कार अपघातात दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू

 

अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री

अंबाजोगाई – येथून आडसकडे जाणाऱ्या रोडवर कार झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात अंबाजोगाई येथील डॉ. प्रमोद राजाभाऊ बुरांडे (वय ३९) आणि डॉ. रवी संतोष सातपुते (वय ३८) यांचा मृत्यू झाला. आज शुक्रवारी(दि.०९) दुपारी १२ वाजता हा अपघात झाला.

डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते हे दोघेही निष्णात फिजिओथेरपिस्ट होते. आडस येथील एका आरोग्य शिबिराला भेट देऊन ते कारमधून (एमएच ४४ एस ३९८३) अंबाजोगाईकडे निघाले होते. आडस ते चनई रोडवर उतारावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेच्या झाडाला धडकली. या अपघातात दोन्ही डॉक्टरांचा मृत्यू झाला. दोन उमद्या डॉक्टरांच्या मृत्यूमुळे अंबाजोगाईत हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!