आ. बाळासाहेब थोरात यांच्या शिवाय निळवंडे कालवा पाणी सोडण्याची चाचणी कार्यक्रम अपूर्ण.
जाखुरी ग्रामस्थांकडून शिंदे सरकारचा जाहीर निषेध
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
निळवंडे धरणातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनीच मोठे काम केले . धरणग्रस्तांना मोठा सन्मान दिला. जमिनी मिळून दिल्या. आणि त्यांना सरकारी संस्थांमध्ये चांगल्या नोकऱ्या दिल्या.जीवनाचे ध्येय मानून आ. थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. प्रत्येक दिवशी या कामाचा पाठपुरावा करणाऱ्या आमदार थोरात यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच निळवंडे कामी कोणतेही योगदान नसलेल्या राधाकृष्ण विखे यांना पाणी सोडण्याची संधी मिळाली
फक्त राजकीय उद्देश ठेवून धरणातून पाणी सोडण्याच्या चाचणी च्या कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब थोरात यांना आमंत्रण दिले नाही
 त्यामुळे जाखुरी गावाच्या वतीने या कार्यक्रमाचा निषेध व्यक्त करत नाराजी व्यक्त केली
यावेळी बाळासाहेब देशमुख,उपसरपंच राजेंद्र पानसरे
किसन पानसरे राजेंद्र देशमुख प्रभाकर बागुल नवनाथ पानसरे रंगनाथ पानसरे अमोल पानसरे शंकर पानसरे राहुल पानसरे बाळासाहेब मांडे आदीसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
 आमदार थोरात हे आज कार्यक्रमात हवेत होते त्यांच्याशिवाय कार्यक्रम अपूर्ण असल्याची भावना जाखुरीकरांनी व्यक्त केली  आहे
2014 ते 19 या काळात कालवे पूर्ण बंद होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येतात पुन्हा मोठा निधी मिळून रात्रंदिवस कामे सुरू ठेवली. ही कामे सर्व आमदार बाळासाहेब थोरात यांनीच केली आहे. या कामांमध्ये विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कायम अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. कालव्यांमध्ये स्वतःच्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. वृक्षारोपण केले , कालवे होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या विखेंचे या कामी कोणतेही योगदान नाही हे सर्वश्रुत आहे.
उपसरपंच राजेंद्र पानसरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!