आरपीआयच्या नाशिक जिल्हा संपर्कप्रमुखपदी विजयराव वाकचौरे यांची निवड
अकोले / लोकवेध live न्यूज
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मुंबई येथील राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीची बैठक पार पडली. या बैठकीत अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी श्रीकांत भालेराव यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र प्रदेश चे उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांची नाशिक जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे .
विजयराव वाकचौरे यांचा जनसंपर्क तसेच पँथर पासून आजपर्यंत ना रामदास आठवले यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे . जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांना सत्तेचा सहभाग मिळवून देण्यात वाकचौरे यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे .
तर राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांची देखील अ नगर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदी फेरनिवड करण्यात आली आहे .
भालेराव यांनी देखील नगर जिल्ह्यात संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून जिल्हा प्रमुखांना सोबत घेऊन नगर जिल्हा रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला बनविला आहे. त्यामुळेच ना आठवले यांनी भालेराव यांचेवर पुन्हा जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे .
आगामी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरवर बैठक संपन्न झाली.या बैठकीत ना.आठवले यांनी राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रसंगी श्रीकांत भालेराव यांची नगर जिल्हा संपर्कप्रमुख , (अकोले) सुगाव येथील राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांची नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख तर आश्वी येथील रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड यांची जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे .
बाळासाहेब गायकवाड पक्षाचे अनुभवी वक्ते आहेत . त्यांच्यातील वक्तृत्व, नेतृत्व जळगाव जिल्ह्यासाठी राजकीय दृष्टीने पूरक ठरणार असल्याने त्यांची देखील जळगाव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे .तर भुसावळ येथील रमेश मकासरे यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या बैठकीस आरपीआयचे राज्याध्यक्ष राजाभाऊ सरोदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे, परशुराम मोरे, सूर्यकांत वाघमारे, शहाजी कांबळे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
