कृषिमंत्र्याच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बोगस खत बी बियाणे औषधाचा सुळसुळाट – वसंत मुंडे

 

परळी वैद्यनाथ / लोकवेध live न्यूज 

 

खरीप पेरणीची सुरुवात लवकरच होणार असून कृषी मंत्र्याच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात अप्रमाणित खते बी बियाणे औषधी पुरवणाऱ्या कंपन्यांनी हाहाकार माजवला मुळे मुख्यमंत्री , मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे बोगस खत बी बियाणे औषधी पुरवणाऱ्या कंपन्या नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे. गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात सन 2019 पासून ते आज पर्यंत विदर्भात व मराठवाड्यात कंपन्या व उद्योजकांच्या एजन्सी द्वारे कृषी दुकानदारा मार्फत शेतकऱ्यांना माल पुरवतात त्यांचे लागेबंध मुख्य गुण नियंत्रक, कृषी आयुक्त, प्रधान सचिव, कृषीमंत्र्याबरोबर
आर्थिक व्यवहाराचे संबंध आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला. कृषी खात्याकडे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभाग स्तरीय राज्यस्तरीय कोणत्या कंपनीचा माल दुकानदारापर्यंत पाठवला त्याचे सविस्तर नोंदी घेतल्या जात नाहीत . शासनाकडे कृषी खात्यामार्फत रिपोर्टही सादर केले जात नाहीत . बोगस बियाणे खते औषधी निघाल्यानंतर अनेक तक्रारी. शेतकऱ्यांनी शासनाकडे केल्या त्यावर रीतसर पंचनामे करून कारवाई करण्याचे शासनाकडून आदेश देण्यात आले, परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान यांच्याकडे मी स्वतः. मला सोयाबीनचे बोगस बियाणे आल्यामुळे पंतप्रधान पोर्टलवर अपील दाखल केले त्यामध्ये मला पंतप्रधान कार्यालयाकडून सदोष व निकृष्ट बियाणे उगवले नाही तर कायद्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही असा निर्णय भारत सरकारने दिलेला आहे .शेतकरी बांधवांनो आपण आता तरी सावध व्हा असे आव्हान आपणास करीत आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करून कंपन्यासोबत बोगस बी बियाणे खते औषधासंदर्भात कृषी खात्याच्या सोनेरी टोळीने धुमाकूळ घातला आहे .बोगस कंपन्यावर कृषी खात्याच्या 1985 मधील कलम 20 व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 मधील कायद्यानुसार कंपन्यांना काळया यादीत टाकून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत . निकृष्ट बी बियाणे खते औषधी संदर्भात कायदा आहे ते दुरुस्त करण्याची मागणी केंद्र व राज्य शासनाकडे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!