अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध गुन्हे दाखल करा काँग्रेसची मागणी

संगमनेर तालुक्यात खाबऱ्याविरुद्ध तीव्र संतापाची लाट

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा विकास व शांतता काहींना पहावत नसल्याने जातीय तेढ निर्माण करून समाज्यात अशांतता निर्माण करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जमावबंदीचा आदेश मोडून आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेची छेडछाड करण्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट उमटली असून या सर्व लोकांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावे अशी आग्रही मागणी संगमनेर तालुक्यातील तमाम जनता व काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

राज्यघटना व सर्वधर्मसमभाव हा विचार जोपासत पुरोगामी व वारकरी संप्रदायाचे पाईक असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहर व तालुक्यात बंधुभाव व तालुक्याचे वातावरण राहावे यासाठी सातत्याने काम केले आहे. मात्र काही समाज विघातक शक्तींनी याला जातीयतेचे रूप देत स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा निंदनीय प्रकार केला आहे.
सकल हिंदू समाजाच्या नावावर अवघ्या तीस-पस्तीस खबऱ्यांचे काम करणाऱ्या लोकांनी आज स्टंटबाजीचे आंदोलन केले आणि यावेळी प्रसिद्धीसाठी सुसंस्कृत व संयमी नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या फोटोची छेडछाड करून काळे लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेची वार्ता समजतात संपूर्ण संगमनेर तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली.

आमदार थोरात हे सर्वमान्य व गोरगरिबांचे संस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्या प्रतिमेला जपण्याचे काम संगमनेर करांनी कायम केले असून गावागावातील हजारो कार्यकर्ते यशोधन कार्यालयात दाखल झाले.मात्र आमदार डॉ तांबे , डॉ.जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ ,विश्वासराव मुर्तडक यांचे सह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले

याप्रसंगी बोलताना आ.डॉ तांबे म्हणाले की, सुसंस्कृत राजकारण हे आपल्या तालुक्याची परंपरा आहे .काही लोकांना हे पहावत नाही. विकास कामात कोणतेही योगदान न देणारे लोक जातीय तेढ निर्माण करू पाहत आहे. संगमनेरची शांतता व सुव्यवस्था बिघडू पाहत आहेत . हे अगदी ठराविक लोक आहेत. अशा वाईट प्रवृत्तींचा तीव्र निषेध सर्वांनी केला पाहिजे मात्र सर्वांनी संयम राखावा असे आवाहन केले

तर बाबासाहेब ओहोळ म्हणाले की , काही मोजक्या लोकांमुळे तालुका अशांत होतो आहे.सर्वांविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावे. अन्यथा तीव्र उद्रेक निर्माण होईल आणि याची जबाबदारी प्रशासनाची राहील. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी सर्व कार्यकर्त्यांवर व्यक्तिगत गुन्हे दाखल करावी अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांना या निवेदनाची प्रत बाबासाहेब ओहोळ, विश्वासराव मुर्तडक, निखिल पापडेजा, रामहरी कातोरे, अजय फटांगरे यांच्या उपस्थितीत देण्यात आली

खबऱ्यांविरुद्ध तालुक्यात संतापाची लाट

सुसंस्कृत व विकसित असलेल्या संगमनेर तालुक्यात काही बाह्य शक्तींच्या तालावर नाचणाऱ्या खाबऱ्यांनी धुडगूस घातला असून ते तालुक्याच्या नेतृत्वाच्या प्रतिमेला छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहे .अशा खाबऱ्यांविरुद्ध शेतकरी महिला नागरिक युवकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे

भाजपकडून जिल्ह्यात झालेल्या मोर्चाच्या ही निषेध

श्रीरामपूर व इतर ठिकाणी भाजपच्या हस्तकाकरवी झालेल्या मोर्चाचे संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी व तालुक्यातील शेतकरी महिला नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!