मनसेच्या वतीने कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी पेंडशेत गावी आरोग्य शिबिर संपन्न
अकोले / लोकवेध live न्यूज
आदिवासी भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. या शिबिरात आदिवासी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, आदिवासी, दुर्गम भागातील अनेक रहिवाशांना आपल्याला झालेल्या आजाराविषयी माहिती नसते, मधुमेह, रक्तदाबासारखे आजार आहे याची जाणीव नसते. आजार वाढल्यावर मग हे रहिवासी डाॅक्टरकडे फेऱ्या मारतात. अशा रहिवाशांना प्राथमिक अवस्थेत आपल्याला असलेल्या व्याधीची माहिती असावी. या उद्देशातून कळसुबाई शिखराच्या पायथ्या जवळ पेंडसेत या आदिवासी गावात दिवसभरासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना उत्तर नगर जिल्हा संघटक श्री. किशोर डोके यांच्या मार्गर्शनाखाली अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत गावी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी उपस्तिथ संगमनेर शहर संघटक श्री. प्रमोद काळे विद्यार्थी सेना संगमनेर शहर अध्यक्ष श्री. संकेत लोंढे पेंडशेत येथील ग्राम संघटक शिवराम बांडे, हेमंत पदमेरे व इतर महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!