“आधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा आशेचा केंद्रबिंदू – रहाणे हॉस्पिटल व रहाणे मेडिकलचे भव्य उद्घाटन”
संगमनेर :

शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात करत रहाणे हॉस्पिटल व रहाणे मेडिकल (लॅप्रोस्कॉपी, वंधत्व उपचार, मातृत्वसेवा व 3D सोनोग्राफी) यांचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता रहाणे हॉस्पिटल, जुने डॉ. श्रीकांत देशमुख हॉस्पिटल, शिवाजीनगर, संगमनेर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (जगप्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक) व डॉ. नितीन घोरपडे (जगप्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन) यांच्या शुभहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रहाणे हॉस्पिटलच्या माध्यमातून संगमनेर व परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास डॉक्टर चित्रलेखा देशमुख, नवनाथ आरगडे, बाबासाहेब धोंडे, अशोक घोलप, रामहरी नवले, जानकीनाथ पांढरकर, अमोल ढमढेरे, सुनील दिघे डॉक्टर जठार डॉक्टर पोखरकर डॉक्टर चत्तर डॉक्टर भोर डॉक्टर खैरनार डॉक्टर ताजणे डॉक्टर मुटकुळे डॉक्टर शेवाळे डॉक्टर होळकर डॉक्टर निघुते आदीसह
विविध क्षेत्रातील डॉक्टर, सामाजिक, राजकीय, धार्मिक, व्यावसायिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी रहाणे हॉस्पिटल व मेडिकलला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या हॉस्पिटलमध्ये सुलभ प्रसूती, सिझेरियन डिलिव्हरी, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण, 3D सोनोग्राफी, तसेच जर्मन कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गर्भपिशवी काढणे, गाठ काढणे, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन व ऑपरेशन उलटवणे यांसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व आभार डॉ. तुषार लक्ष्मण रहाणे डॉ. सौ. वृषाली तुषार रहाणे , गं.भा. मंगल लक्ष्मण रहाणे, श्री. पांडुरंग बबन रहाणे, श्री. गौरव लक्ष्मण रहाणे, श्री. रामनाथ बबन रहाणे व सौ. डॉ. सोनाली गौरव रहाणे यांनी केले.
रहाणे हॉस्पिटलच्या माध्यमातून संगमनेर व परिसरातील नागरिकांना दर्जेदार, आधुनिक व विश्वासार्ह वैद्यकीय सेवा मिळणार आहे.
