शिवजयंतीनिमित्ताने साईबाबा हॉस्पिटलमध्ये हृदयरोग व मधुमेह तपासणी शिबीर उत्साहात संपन्न!!

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील रुग्ण सेवेचे हित जोपासणारे दे.ना गोडगे प्रतिष्ठान संचलित साईबाबा हॉस्पिटल मध्ये आज गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलचे डॉ.जगदीश वाबळे तसेच साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉ. नंदकुमार गोडगे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग व मधुमेह तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले.यावेळेस मोफत मधुमेह, रक्तदाब,ईसीजी तपासणी करुन रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबिरात जवळजवळ 100 हून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराला सुरुवात करण्यात आली.यावेळी रयत शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश दिघे सर,तळेगावचे माजी उपसरपंच रमेश दिघे,शरद भागवत,सागर भागवत,अमोल पाडेकर, निखिल सानप,जनसंवाद चॅनेलचे संपादक दत्तात्रय घोलप आदींसह मान्यवर उपस्थितीत होते.अनेक मान्यवरांनी भाषणे केलेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश दिघे सर यांनी केले तर आभार डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी मानले सदर शिबिर यशस्वीतेसाठी मेडिकव्हर हॉस्पिटल व साईबाबा हॉस्पिटलच्या सर्व स्टाफने अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!