मोबाइल दुकानात धाडसी चोरी ,
दहा हजार रोख रकमे सह मोबाइल व लॅपटॉप चोरी, दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद
 दुकानातून चोरट्यांनी अत्यंत शिताफीने चोरी केली.
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील साईनाथ मोबाइल दुकानाचे छताचे पत्रे खोलून चोरट्यांनी दुकानातील दहा हजार रुपये रोख रक्कम, विविध कंपन्यांचे महागडे मोबाइल ,दोन लॅपटॉप, चार्जर, पावर बॅंक इतर किरकोळ सामान लांबवले. शनिवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान वाजता पिंपरणे येथे ही धाडसी चोरी करण्यात आली. दोन चोरट्यांनी नियोजनबद्धरीत्या  ही चोरी केल्याचे  दिसत आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारी लावलेल्या  सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले असले तरी या धाडसी चोरीचा शोध लावण्याचे आव्हान संगमनेर तालुका पोलिसांसमोर आहे. घटनेची माहिती मिळताच परी उपविभागी पोलीस अधिकारी शिरीष बी वमने  पोलीस उपनिरीक्षक सानप राहुल, हेड कॉन्स्टेबल बिलाल शेख , पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शेंगाळ आदींनी भेट देत पंचनामा केला
 दुकानमालक अनिल ठोंबरे यांच्या तक्रारीनुसार
शनिवारी रात्री साडेबारा च्या सुमारास सीसीटीव्ही फुटेज च्या अंदाजानुसार दोन युवक दुकान कडे येताना दिसले  त्यांनी शिडी लावून दुकानच्या छतावर गेले व पत्रे खोलून  एक संशयित दुकानात शिरला. दुकानातील दहा हजार रोख रकमेसह रिपेरिंग साठी आलेल्या विविध कंपन्यांचे अंदाजे १ लाखांचे मोबाइल इतर पार्ट व दोन लॅपटॉप अशी जवळपास दोन लाखांच्या वर सामानाची चोरी केली  दरम्यान, संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे. लवकरच गुन्ह्याचा छडा लावला जाईल, असा विश्वास पोलिसांनी यांनी व्यक्त केला. सदर चोरीचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली परी उपविभागी पोलीस अधिकारी शिरीष बी वमने  पोलीस उपनिरीक्षक सानप राहुल, हेड कॉन्स्टेबल बिलाल शेख पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शेंगाळ हे करत आहे
छताचे पत्रे खोलून चोरी करणे चोरट्यांचा चोरीचा नवा प्रकार 
दोन महिन्यापूर्वी गावातील सिद्धार्थ किराणा स्टोअर अशाच प्रकारे फोडले होते त्या चोरीचाही अद्याप शोध लागलेला नाही याचप्रमाणे गावात जवळपास दहा पंधरा वेळेस दुकान फोडून चोरी केलेली आहे पोलीस मात्र हातावर हात ठेवून बसले आहेत प्रत्येक वेळेस चोरीचे पंचनामे करणे चोर शोधण्याचे आश्वासन देणे हा पोलिसांचा नित्यक्रम झालेला आहे चोऱ्यांचे सत्र थांबले नाही तर ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेतील असे जमलेल्या ग्रामस्थांनी सांगितले 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!