डिग्रस गावात एका रात्रीत चार ठिकाणी दरोडा ; साखळी पद्धतीने टाकला दरोडा, परिसरात भीतीचे वातावरण

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात  २३ जुलै रोजी रात्री एक ते दोन च्या सुमारास चोरट्यांनी साखळी पद्धतीने दरोडा टाकला आहे, सदर दरोडेखोर  हे सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 यमाजी सिदाजी रुपनर, मारुती लिंबाजी खेमनर, जबाजी किसन नान्नर, ज्ञानेश्वर मुरलीधर नान्नर या चारही शेतकऱ्यांची घरे डिग्रस गावात जाणारया एकाच रस्त्यालगत आहेत चोरट्यांनी शेजवार सुरुवात करत  घराबाहेरील लाईट चे बल्ब काढून अंधाराचा फायदा घेत घरात प्रवेश केला, मात्र शेतकरी कुटुंबातील सर्वच गाढ झोपेत असल्याने चोरट्यांनी कपाट, डबे,पेटी ची उचकापाचक करत काही रक्कम लंपास केली आहे.
मारुती खेमनर यांच्या घरातून पेटी कपाट घराच्या पाठीमागे नेऊन उचकापाचक केली  तर जबाजी नान्नर यांच्या घरातून एक हजार रुपये रक्कम व ज्ञानेश्वर नान्नर यांच्या कपड्याच्या खिशातून पाकिटासह पाच हजार रुपये रक्कम, क्रेडिट कार्ड लंपास केले आहे.
 चोरट्यांनी आणखी पुढे जात रामा सतु खेमनर या शेतकऱ्यांच्या घरावर मोर्चा वळवला तेथेही कपाट व  पेट्याची उचकापाचक करत काही रक्कम लंपास केली आहे. घरातील सर्व सामान कपडे अस्ताव्यस्त करत घराबाहेर एक पाहुण्यांची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी गाडी चोरुन नेली आहे.
सदर घटनेची माहिती सकाळपर्यंत डिग्रस गावात कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त सांत्वन केले आहे.
 ग्रामपंचायत डिग्रस अंभोरे मालुंजे हद्दीतील सी सी टी व्ही कॅमेरे तपासून घटनेचा तपास लागु शकतो, रात्री अकराच्या सुमारास एक बोलेरो गाडी व एक ओमिनि गाडी डिग्रस गावात जाताना दिसली अशी माहिती काही ग्रामस्थांना संशयास्पद वाटली आहे. धाडसी सराईत गुन्हेगारांची उकल झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आज उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!