सावधान ! बिबट्या दिवसाही करतो हल्ला,
संगमनेर तालुक्यात या गावात सकाळी ९ वाजता तरुणावर बिबट्याचा हल्ला
दाढ शिवारात दिवसा ढवळ्या सकाळी ९ वाजता एका व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला !
परिसरात भीतीचे वातावरण लावण्याची ग्रामस्थांची मागणी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी – अझमपूर येथील एका ४६ वर्षिय व्यक्तीवर सकाळी नऊ वाजता दाढ खुर्द शिवारात बिबट्याने हल्ला केला मात्र लोकांची तप्तर मदत मिळाल्याने त्यांचा जीव वाचला .
मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र गीते हे आपल्या घराकडून दाढ खुर्दच्या दिशेने सकाळी ९ वाजता दुचाकीवर आपल्या मळ्यात जात असताना दाढ खुर्दच्या शिवारातील असणाऱ्या लोखंडी पुला जवळ दबा धरुन बसलेल्या बिबट्याने राजेंद्र गीते यांच्या हल्ला केला . हल्ल्यात राजेंद्र गीते खाली पडले मात्र सावध होवून मोठ्याने आरडा – ओरड केल्याने आजू- बाजूच्या लोकांनी धाव घेतल्यामुळे त्यांच्या जीव वाचला .
राजेंद्र गीते यांच्या पायाच्या बिबट्याने धरल्याने बोटाला दात लागल्याने किरकोळ जखम झाली त्यांना प्राथमिक उपचाराकरिता दाढ खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले . मात्र पुढील उपचाराकरिता गीते यांना अहमदनगर येथे हलविण्यात आले . याबाबत वनविभागाला कळविण्यात आले .
तालुक्यातील पुर्व भागातील दाढ खुर्द , दाढ बु ॥ , प्रतापपूर , खळी , पिंप्री लौकी अझमपूर , पानोडी , शेडगाव , शिबलापूर आदी परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून वनविभागाने त्वरीत या बिबट्याचा बदोबस्त करावा अशी मागणी केली आहे .
दाढ खुर्द शिवारात महीन्यामध्ये ही दुसरी घटना असल्याने लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली असून वनविभागाने त्वरीत पिंचरा लावून बिबट्यास जेल बंद करावेसतिष जोशी ( संरपच , दाढ खुर्द )
