बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी ईश्वरीची सौ .दुर्गाताई तांबे व इंद्रजीत भाऊ थोरात यांच्याकडून चौकशी

संगमनेर / लोकवेध live न्यूज 


काल रात्री खांडगाव येथील ईश्वरी विजय बालोडे वय वर्ष तीन  हिच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केल्याने ती जबर जखमी झाली. त्यामुळे तिला संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात असून नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे व  इंद्रजीत भाऊ थोरात यांनी प्रत्यक्ष भेट देऊन हॉस्पिटल प्रशासनाशी चर्चा करून योग्य ते उपचार करण्याची सूचना केल्या.

खांडगाव परिसरात असलेली चिमुकल्या ईश्वरी वर काल बिबट्याने हल्ला केल्या होत्या तीन वर्षाची ईश्वरी यामुळे खूप घाबरली तिला जखमा झाले असून तिला तातडीने मेडिकवर या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आता ती सुखरूप असून तिची चांगली काळजी घ्यावी अशी सूचना सौ दुर्गाताई तांबे व इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिले आहेत

यावेळी समवेत  रमेश गुंजाळ, नवनाथ  आरगडे, सौ.अर्चनाताई बालोडे, रामनाथ कू -हे,जनसेवक बाळकृष्ण गांडाळ, मोहन गुंजाळ आदींसह विविध पदाधिकारी होते.

ईश्वरी वर हल्ल्याची बातमी समजतात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने तिला मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी या मुलीच्या आई-वडिलांची संवाद साधत तिची चौकशी केली.
याबद्दल तिचे आई-वडील यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात , डॉ सुधीर तांबे व यशोधन कार्यालयाचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!