बालगोपाळांचा आषाढी एकादशी निमीत्ताने पायी दिंडी सोहळा.”ज्ञानोबा माऊली तुकाराम ” जयघोषात अवघी अंभोरे नगरी दुमदुमली.
अंभोरे : लोकवेध live न्यूज
महाराष्ट्र ही संताची भूमि आहे.अनेक महान संत,महात्मे या पा महाराष्ट्रातील पवित्र मातिने दिले.संपुर्ण महाराष्ट्रात हिंदु धर्म आणि वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पतागा वाढविने आणि त्याचे रक्षण करण्याचे महान कार्य विठूरायाचा भक्त, वारकरी करित आहे.महाराष्ट्र जशी संताची भूमि त्याचप्रमाणे अंभोरे गावही संताची भूमि आहे.महाराष्ट्रात आणखीन एक महान संताची भर पडली ती ह.भ.प.वैंकुंठवाशी लक्ष्मण महाराज खेमनर यांची.अंभोरे गावाने असे संत महात्मे दिले ते वैकुंठवाशी लक्ष्मण महाराज खेमनर हे होय.यांची जन्मभूमी अंभोरे आणि कर्मभूमि इगतपुरी लक्ष्मण महाराज हेही एक महान संत होय.त्यांच्या या पवित्र भूमीत आज बुधवार दि.28/06/2023 रोजी सकाळी 9 वा. पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले.यात मल्हरराव होळकर विद्यालय आणी ज्युनियर कॉलेज,अंगणवाडी,शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थिनी,यांनी वारकरी वेशातील वेशभूषा केली आणी वारकरी झाले.अंगात नेहरु शर्ट,धोतर,पायजमा,आणी विद्यर्थिनिंनी सुंदर नऊवार साडी पोशाख परिधान केली होती.त्यामूळे गावात काही काळ धार्मिक,अभंग,भजन,ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामाने पंढरपूर सोहळा निर्माण झाला.या सोहळ्याचा ग्रामस्थ,महिला यांनीही आंनद घेतला. अंभोरे गाव काही काळासाठी प्रति पंढरपूर अवतरले होते शाळेतील विद्यार्थी आणी विद्यार्थिनी पांडूरंग विठ्ठल-रुख्मिणी यांची वेशभुषा केलेली होती.त्यामूळे साक्षात विठ्ठल रुख्मिणी अवतरले होते.संगमनेर तालुक्याचे भाग्य विधाते सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांचे संकल्पनेतील दंडकारण्य अभियान अंतर्गत भव्य वृक्ष दिंडी, पायी दिंडी सोहळा प्रस्थान शाळे पासुन टाळ-मृदंगाचे गजर करित ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जय घोष करित गावातील प्रमुख मार्गावरुन संपुर्ण अंभोरे गावातून मार्गक्रमंन करित अखेर मल्हारराव होळकर विद्यालय आणी ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वृक्ष दिंडी आणी दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.दिंडी सोहळ्यात सामाजिक एकता,बंधूभाव याचा संदेश देण्यात आला.दंडकारण्य अभियान यशस्वी करण्यासाठी अंभोरे गावचे श्री.एस.एम.खेमनर सर यांची कन्या वनक्षेत्रपाल कुमारी मिना सखाराम खेमनर हिने विविध फळांची जातीची एक हजार वृक्ष देउन बहुमोल असे सहकार्य केले.यातील एक विद्यार्थी,विद्यार्थिनीस प्रत्येकी एक वृक्ष (झाड)देउन वितरण करण्यात आले.या प्रत्येक वृक्षाचे,झाडांचे पुर्ण संगोपन आणी काळजी कशी घ्यावी याबाबत प्राचार्य श्री.गायकवाड़ सर यांनी मार्गदर्शन केले.दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी अंभोरे,कोळवाडे,डीग्रस या परिसरातील भजनी मंडळाने विशेस सहभाग घेतला. त्यांचा शाळेचे वतीने स्थानिक पदाधिकरि,प्राचार्य यांचे शुभहस्ते श्रीफळ देउन सन्मान करण्यात आला.प्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सदस्य सन्माननीय सहादु दामू खेमनर,अंभोरे सोसायटीचे चेअरमन सन्माननीय रावजी भागा खेमनर,सरपंच सौ.सुरेखा भाउसाहेब खेमनर,उपसरपंच किसनराव सोपान खेमनर,श्री.अहिलू काशिनाथ जगनर,ग्रामपंचायत सदस्य श्री.भाऊसाहेब रखमा खेमनर,स्थानिक स्कूल कमेटि सदस्य,श्री.सोपानराव राधु खेमनर,सोपान काशिनाथ खेमनर,विठोबा नामदेव खेमनर,श्री.बबनराव सुभा खेमनर,श्री.बाबुराव कारभारी जगनर ,श्री.चांगदेव भागा खेमनर,श्री.सुभाषराव हळनोर ,गावातील प्रमुख भजनी मंडळ ,श्री.रेवजी अन्दू खेमनर,डॉ.नानासाहेब कोटकर,ज्ञानदेव (माऊली) खेमनर,श्री.लालू कडू,श्री.राजेंद्र कुदळ,डीग्रस येथील मुरलीधर रूपनर,श्री.चंद्रभान कडनर ,श्री.सिताराम वाघमोड़े श्री.गोरख बिडवे ,नामदेव बर्डे,सौ.शालन सुर्यवंशी,ग.भा.कांताताई पगारे ,आदींचे बहुमोल सहकार्य लाभले आणि दिंडी सोहळा यशस्वी केला.सोहळ्यातील सर्व* *विद्यार्थी,विद्यार्थीनीना व उपस्थित ग्रामस्थांना गावचे जेष्ठ,साई भक्त श्री.आंबादास काळपाटील खेमनर यांनी फराळाचे आयोजन केले .तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनिंना,ग्रामस्थांना चहा आणी पाण्याचे नियोजन गावातील एक उद्योजक , इंजिनीयर महेश खेमनर यांनी केले.या सर्वांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्हरराव होळकर विद्यालय आणी ज्युनियर कॉलेज शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेस परिश्रम घेतले.*
