पट्टेवाडी शाळेस आधारची शैक्षणिक साहित्याची मदत…..

मुलांना दप्तर,शालोपयोगी साहित्य,सॅन्डल शैक्षणिक साहित्य 

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेरातील पगडाल परिवाराची जपान स्थित कन्या इंजीनिअर सौ. अक्षया चंदेश घुले (पगडाल) यांनी सामाजिक बांधीलकी जपत दुर्गम आदिवासीबहुल शाळेला शैक्षणिक साहित्यासाठी १० हजार रुपयांची देणगी दिली. पट्टाकिल्ला या शिवकालीन गडाच्या पायथ्याशी वसलेल्या पट्टेवाडी या अतीदुर्गम गावी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून या शाळेत पंचक्रोशीतील १७ आदिवासी मुले शिक्षण घेत आहेत.या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या शेक्षणिक साहित्याची नेहमीच वाणवा असते. आदिवासी विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेउन सौ अक्षया यांनी आपले पती चंदेश घुले यांचेशी चर्चा करून या मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. आधारचे शिलेदार श्रीनिवास पगडाल यांचेमार्फत घुले यांनी संपर्क करून या मुलांना दप्तर,शालोपयोगी साहित्य,सॅन्डल शैक्षणिक साहित्याचा संच बनविण्यात आला.
या सर्व शैक्षणिक साहित्य संचाचे वितरण आधारचे समन्वयक डॉ.महादेव अरगडे,आधारचे शिलेदार सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल,एकनाथ साबळे यांनी पट्टेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना सुपूर्द केले.याप्रसंगी पट्टेवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बहिरू गोडे,ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक गोडे,गणपत गोडे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.दप्तर व सॅन्डल हातात मिळताच मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश डोंगरे यांनी केले.आधारचा शाळा दत्तक उपक्रम निश्चितच वंचितांसाठी लाभदायी असल्याचे मनोगत श्रीनिवास पगडाल यांनी केले.आधारच्या उपक्रमाबद्दल अधिक माहिती डॉ.महादेव अरगडे यांनी दिली.एकनाथ साबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आधारचे समन्वयक सुखदेव इल्हे व सोमनाथ मदने यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किसन गभाले यांनी केले.या उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ,केंद्रप्रमुख सुनील नरसाळे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!