या गावात आदिवाशी वस्तीतील जलजीवन योजनेची पाण्याची टाकीचं गायब करण्याचे कारस्थान ? आदिवाशी समाजासह ग्रामस्थही आक्रमक !
संगमनेर / लोकवेध live न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी संकल्पनेतून प्रत्येक गावांत जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवितांना एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी शासन घेत असताना उंबरी – बाळापूर येथील आदिवाशी समाज्यालाचं या योजनेपासून वंचित करण्याचा डाव ग्रामसभेतून दिसून आल्याने आदिवाशी समाज्यांसह ग्रामस्थांनी ही हरकती घेत ग्रामसभेवरचं बहिष्कार टाकून पुन्हा ग्रामसभा घेण्याची मागणी केली .
संगमनेर तालुक्यातील उंबरी – बाळापूर येथील जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेच आराखडा तयार करण्याकरिता घेण्यात आलेल्या ग्रामसभेत आदिवाशी समाज्याच्या वस्तीतील पाण्याची टाकीचं गायब करण्याचा आखण्यात आलेला डाव आदिवाशी समाज्यातील कार्यकर्त्यानी हाणून पाडला यावेळी सरपंच व उपसरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
जलजीवन मिशन योजनेत प्रत्येकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करुनच पुढील 30 वर्षांचे नियेाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ही योजना 2024 पर्यंत पूर्ण करावयाची असल्यामुळे तातडीने आराखडा ग्रामसभेमार्फत घेवून गावातील एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने नियमित ग्रामसभा घ्यावी. प्रत्येक व्यक्तींला 55 लिटर दरडोई पाणी मिळणार असल्याने पाण्याचा वापर अधिक होईल व त्यातून सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने येत्या काळात भूमिगत गटाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून येत्या दोन वर्षांत प्रत्येक वाडा, वस्ती व पाड्यांत जाण्यासाठी बारमाही रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे शासनाचे नियोजन आहे मात्र काही लोकांच्या हेकेखोरपणामुळे आदिवाशी वस्तीतील पाण्याची टाकी गायब करण्याचा कट रचला ही बाब आदिवाशी कार्यकर्त्याच्या लक्ष्यात आल्याने ग्रामसभेत याला विरोध करण्यात आला . मात्र आदिवाशी कार्यकर्त्याचे कोणी ही म्हणणे ऐकू न घेत बळजबरीने जलजीवनचा ठराव मंजूर केला गेला मात्र याला संपूर्ण आदिवाशी समाज्यांसह ग्रामस्थांनी ही विरोध दर्शवित ग्रामसभेवर बहिष्कार टाकला .
यावेळी आदिवाशी समाज्याकरिता शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात मात्र गांव पातळीवर हेकेखोरपणामुळे अनेक योजनेपासून आदिवाशी समाज्याला वंचित ठेवण्याचा प्रकार दिसून येत आहे . गेल्या ५० वर्षापासून आदिवाशी समाज पाण्याच्या समास्यांनी ग्रासलेला असता . जलजीवन योजने पासून वंचित ठेवण्याचा डाव होत असल्याने ही ग्रामसभा पुन्हा घेवून आदिवाशी समाज्याच्या वस्तीवरील आराखडा हा वस्तीमध्येचं करावे अशी मागणी एकलव्य संघटनेचे तालुकाधक्ष अनिल बर्डे . नानासाहेब बर्डे , मच्छिंद्र बर्डे , राधू बर्डे , विक्रम बर्डे , संदिप बर्डे , जालिंदर बर्डे , गोरख बर्डे , नवनाथ बर्डे , भास्कर बर्डे बाबासाहेब बर्डे , मधुकर ब्राहमणे , सोननाथ ब्राहमणे याच्यासह ग्रामस्थांनी केली .
