निमगाव जाळी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

 

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी

 

संगमनेर येथे निमगाव जाळीचे भूषण व महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव राणुजी जोंधळे साहेब यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त बालाजी ग्रामीण सांस्कृतीक कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित व राजे शिवाजी बहुउद्देशीय प्रतिष्ठान,के.आर.जोंधळे कृषी व सेवाभावी संस्था,जय मल्हार तरुण मंडळ,विघ्नहर्ता तरुण मंडळ,अष्टविनायक तरुण मंडळ,शहीद जवान स्मारक समिती,संयम ग्रुप दुधेश्वर मित्र मंडळ,गगणगिरी मंडळ व मानव अधिकार संघटना यांच्या सहकाऱ्यांने भव्य रक्तदान शिबिराचे ग्रामदैवत हनुमान मंदिर, निमगाव जाळी येथे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी 9 वाजता सर्व ग्रामस्थ व आयोजकांच्या वतीने केक कापून मा. शिवाजीराव जोंधळे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिरात 27 व्यक्तींनी रक्तदान केले .या कार्यक्रमास माजी सरपंच अमोल जोंधळे,मुंबई सिनेटचे सदस्य रवींद्र रसाळ,राजे शिवाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक जोंधळे,कार्याध्यक्ष दिलीप डेंगळे,खजिनदार सोपानराव तळोले,पत्रकार अशोक गोसावी, पत्रकार राजू थेटे,माजी प्राचार्य विलासराव जाधव, प्रवरा बँकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे ,किरण आरगडे उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे,ग्रामपंचायत सदस्य सुरेशराव डेंगळे ,दिलीप डेंगळे, वैभव वदक, जितेंद्र जोंधळे,ग्रामसेवक संपत मिसाळ,प्रकाश थोरात, नितीन जोंधळे,सुनील तांबे,बालाजी प्रतिष्ठानचे भानुदास धनवटे ,अमोल दिंडोरे अविनाश पवार,दत्ता दिंडोरे,आकाश धनवटे,प्रशांत काकड,ज्ञानेश्वर निबे,आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्रात प्रथमच 121 वेळा रक्तदान केलेले रक्तदाते शिवाजी जगन्नाथ निर्मळ हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र लंगोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन गंगाराम धनवटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!