लोकसहभागातून आपले गावं समृध्द बनवावे -अनिल नागणे गटविकास अधिकारी
संगमनेर : लोकवेध live न्यूज
पंचायत समिती संगमनेर,सप्रेम , नवदृष्टी व डॉर्फ केटल यांच्या संयुक्त विद्यमाने “डॉर्फ केटल मँगो कप २०२४” चे आयोजन केल्या गेले आहे ही स्पर्धा अहमदनगर जिल्हातील संगमनेर, अकोले व नाशिक जिल्हातील सिन्नर , इगतपुरी तालुक्यात राबवली जाणार आहे. या स्पर्धेचा उद्देश तालुक्यांतील ग्रामपंचायतींना सक्षम बनवने व ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढवणे हा आहे. “डॉर्फ केटल मँगो कप २०२४” या स्पर्धेत विजेते गावाला १ लाख प्रथम पुरस्कार, व्दितीय पुरस्कार ७५ हजार व तृतीय पुरस्कार डॉर्फ केटल इंडिया प्रा. ली. यांच्या मार्फत देण्यात येणार आहे.
पंचायत समिती संगमनेर, सप्रेम , नवदृष्टी संस्था मुंबई व डॉर्फ केटल कंपनी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मियावाकी जंगल स्पर्धामध्ये सहभागी ग्रामपंचायत झोळे येथील “भविष्य मियावाकी प्रकल्पला मा. अनिल नागणे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर व ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. ठाकूर साहेब पंचायत समिती संगमनेर व सप्रेम संस्थेचे प्रकल्प समन्वयक हिमांशु लोकरे यांनी मियावाकी प्रकल्पाची भेट दिली. तसेच नव्याने सुरू असलेल्या “डॉर्फ केटल मँगो कप २०२४” च्या अनुषंगाने ग्रामपंचायत झोळे यांनी ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढवे या उद्देशाने ८०० केशर आंबा वृक्ष आज लागवड केली. त्यामध्ये गावातील ग्रामपंचायच्या जागेवर या स्पर्धेच्या अनुषंगाने गावातील प्रत्येक कुटुंबाला १ वृक्ष, सरकारी इमारत,शाळा ,हॉस्पिटल येथे ५ वृक्ष व सार्वजनिक जागेवर ३०० आंबा वृक्ष लागवड करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात झोळे गावाला मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळणार आहे व गावाचा चांगल्या रीतीने विकास करता येईल.
मा. अनिल नागणे साहेब यांनी आज आंबाचे वृक्ष लागवड करून सर्व गावांनी या प्रकारचे उपक्रम राबवून गावातील ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढवावे व लोकसहभागातून आपले गावं समृध्द बनवावे असा संदेश दिला . या कार्यक्रमाच्या वेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, महीला, विदयार्थी, उपस्थित होते.
