श्री.क्षेत्र जाखुआई मंदिरास यात्रा शिल्लक वर्गणीतून 131000 रू ची रेखीव आणि भव्य दिव्य चौकट अर्पण
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथील जागृत देवस्थान श्री.क्षेत्र जाखुआई देवस्थान मंदिर जाखुरी येथे देवी यात्रा शिल्लक वर्गणीतून 131000रू ची चौकट अर्पण करण्यात आली यावेळी प्रसाद जोशी गुरू यांच्या मंत्रोपचाराने विधिवत पूजा व देवस्थानचे अध्यक्ष किसन पानसरे व उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या शुभहस्ते पूजा करून उभी करण्यात आली.
त्यावेळेस जाखुआई देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष किसन पानसरे,उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख ,विश्वस्त – रंगनाथ पानसरे,गोरक्ष राहाणे,दत्तात्र्थ पानसरे, संदिप मांडे,दशरथ देशमुख, राहुल पानसरे ,भाऊसाहेब राहणे, बाबुराव राहाणे गोविंद देशमुख, बाजीराव राहणे, शंकर राहणे, रंगनाथ पानसरे,भानुदास मांडे, दिलीप म्हस्के, पंडीत देशमुख, वसंत देशमुख, कांताराम भाऊ मनोहर फिटर, पप्पू जोशी (गुरु)आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते
