जाखुरीत प पू गगनगिरी महाराज सप्ताह निमित्त साधुसंतांच्या उपस्थिती ध्वजारोहन
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्राचा खोरी येथे सुरू होणाऱ्या स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह निमित्त गगनगिरी महाराज आश्रमाचे पदाधिकारी आणि साधू संतांच्या शुभहस्ते हात उंचा वून गगनगिरी महाराजांचा जयजयकार करत उपस्थित साधूसंतांच्या आणि मान्य वरांच्या आणि हजारो भावीकभक्तांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले
संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी च्या पुण्यभूमीमध्ये अधिकमासाच्या निमि त्ताने विश्वगौरव विभूषित महायोगी परम पूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह ९ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या सात दिवसाच्या कालावधीत पार पडत आहे या निमित्ताने सप्ताह स्थळी ध्वजारोहण गग नबावडा आश्रमाचे संजयसिंह पाटणकर खोपोली आश्रमाचे बालयोगी गणेशगिरी महाराज खोपोली आश्रमाचे शिवाजीराव पाटणकर यांच्यासह त्र्यंबकेश्वरच्या जुना आखाड्याचे महंत शंकरानंद महाराज विश्वगिरी महाराज बलगंधगिरी महाराज रामानंद गिरी महाराज मुक्तानंदगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला
जाखुरी येथील ग्रामदैवत असणाऱ्या जाखूआई मंदिरापासून सनईचौघड्याच्या स्वरात डीजेच्या दनदनाटात वाजतगाजत भजनी मंडळ, टाळ मृदंगाच्या गजरात गगनगिरी महाराजांच्या जय घोषात मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक ग्राम प्रदक्षिणा करत शिवरस्ता मार्गे स्वामी गगनगिरी महाराज सप्ताहस्थळी गेली या मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी सडा रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या तसेच कलशधारी आणि तुळसधारी महिला तसेच भगवे टी-शर्ट घातलेले तरुणही सहभागी झाले होते सजविलेला रथामध्ये स्वामी गगनगिरी महाराजांची मूर्ती सर्वच भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेत होती तसेच सजविलेल्या अश्वारूढ रथातात, बैलगाडीत साधु संत विराजमान झाले होते
सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे आणि संजय महाराज देशमुख यांनी सप्ताहाच्या पूर्व तयारीची माहिती दिली
यावेळी डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे, संजय महाराज देशमुख, बाळासाहेब आंभोरकर शरयुताई देशमुख
वसंतराव देशमुख, बाळासाहेब देशमुख
सतीशराव कानवडे, कपिल पवार किसन पानसरे,राजेंद्र पानसरे राजेंद्र देशमुख, व नितीन पानसरे,आदीसह जाखुरी पिंपरणे कनोली अंभोरे देवगाव शिरापूर निमगाव टेंभी कोळवाडे नागापूरवाडी जोर्वे खराडी वाघापूर गावातील भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होतेसेवा करा आणि पुण्य मिळवा- पाटणकर
स्वामी गगनगिरी महाराजांचे विचार नवीन तरुण पिढीमध्ये निर्माण व्हावा या करिता दिलीपराव शिंदे आणि संजय महा राज देशमुख हे सातत्याने प्रयत्न करत असतात जसा अनेक वर्षानंतर त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होत असतो तसाच हा तीन वर्षानंतर स्वामी गगनगिरी महाराजअखंड हरिनाम सप्ताहाचा कुंभमेळा होत असतो याच कुंभमेळ्यामध्ये अनेक भावीक भक्त साधूसंतांचे दर्शन होत असते त्यामुळे साधुसंतांची सेवा करत जी हाताला सेवा येईल ती सेवा करा आणि पुण्य मिळवा असा उपदेश गगनबावडा आश्रमाचेप्रमुख संजयसिंह पाटणकर यांनी दिला
संगमनेर तालुक्याला खूप मोठी धार्मिक परंपरा आहे – सुधीरजी तांबे
संगमनेर तालुक्याला खूप मोठी धार्मिक परंपरा आहे स्वामी गगनगिरी महाराजांची सेवा करण्याची संधी जाखुरीकरांना मिळाली आहे या अद्भुत पूर्व सप्ताह मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे या ठिकाणी भाविक साधुसंत यांच्या अमृतवाणीने आणि पदर स्पर्शाने ही भूमी पुण्यवान होणार आहे हा गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादाने सप्ताह अस्मरणीय होईल
