जाखुरी येथील प पू स्वामी गगनगिरी महाराजांचा सप्ताह न भूतो न भविष्यती असा होणार – रणजितसिंह देशमुख
राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सप्ताह पूर्वतयारीची पाहणी केली

पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी या ठिकाणी अदिक मासात होत असलेल्या विश्व गौरव विभूषित महायोगी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या नावाने पुरुषोत्तम मासात होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा 9 ऑगस्ट ला सुरू होत असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा पुण्यपूर्व अखंड हरिनाम सप्ताह पर्व सातवे या वर्षी श्री क्षेत्र पुण्यभूमी जाखुरी या ठिकाणी 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे  या भव्य दिव्य सप्ताहाच्याआयोजन संदर्भात आढावा घेण्यासाठी राजहंस दूध संघाचे चेअरमन  रणजितसिंह देशमुख यांनी भेट दिली

सप्ताह बद्दलची सर्व माहिती जाणून घेतली तसेच प्रत्येकाने सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केले

यावेळी सप्ताहाचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे.  हभप संजय महाराज देशमुख ,  पिंपरणे एमएसईबी केंद्राचे दिग्विजय लोहेसाहेब, कपिल पवार, मनीष माळवे आदी उपस्थित होते

यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे व संजय महाराज देशमुख यांनी सप्ताह विषयीची पूर्वतयारीची संपूर्ण माहिती दिली

यावेळी रणजीतसिंह देशमुख म्हणाले की स्वामी गगनगिरी महाराजांची सेवा करण्याची संधी जाखुरीकरांना मिळाली आहे या अद्भुत पूर्व सप्ताह मध्ये सर्वांनी तन-मन-धना ने सहभागी व्हावे या सप्ताहाचे सातवे पर्व असून या अगोदरही असा सप्ताह झाला नाही यापुढे असा होणार नाही असं कार्य आपण सर्वांनी मिळून करून दाखवायचे आहे सर्वांनी यात एकजुटीने सहभागी व्हा व मिळेल ती सेवा तन मनाने करा स्वामींचे आशीर्वाद आपल्या बरोबर असेल

   कथा मंडप  सर्व मंडप वॉटरप्रूफ , साधूंसंत विश्रांती मंडप, यज्ञ मंडप, घटस्थापना मंडप ,महिला जप मंडप, प्रहारेकरी मंडप तयार झाले प्रत्येक गावात बॅनर पोस्टर लावण्यासाठी हजारो गगनगिरी भक्त परिश्रम घेत आहे  भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन भरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे   यावेळी  जाखुरी पिंपरणे कनोली अंभोरे देवगाव शिरापूर निमगाव टेंभी कोळवाडे हंगेवाडी नागपूरवाडी जोर्वे खराडी वाघापूर या गावातील भक्त मंडळ यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!