जाखुरीतील स्वामी गगनगिरी महाराजांचा सप्ताह ऐतिहासिक होणार – आ थोरात
आ बाळासाहेब थोरात यांनी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सप्ताह पूर्वतयारीची पाहणी केली
पिंपरणे / लोक वेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुरी या ठिकाणी विश्व गौरव विभूषित महायोगी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या नावाने पुरुषोत्तम मासात होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा 9 ऑगस्ट ला सुरू होत असून त्याची अंतिम तयारी पूर्ण झाली असून परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांचा पुण्यपूर्व अखंड हरिनाम सप्ताह पर्व सातवे या वर्षी श्री क्षेत्र पुण्यभूमी जाखुरी या ठिकाणी 9 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे या भव्य दिव्य सप्ताहाच्या आयोजन संदर्भात आढावा घेण्यासाठी आ. बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली
सप्ताह बद्दलची सर्व माहिती जाणून घेतली तसेच प्रत्येकाने सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केले
यावेळी राजहंस दूध संघाचे चेअरमन माननीय श्री रणजितसिंह देशमुख सप्ताहाचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे. ह.भ.प. संजय महाराज देशमुख , कपिल पवार, बाळासाहेब देशमुख किसन पानसरे राजेंद्र देशमुख राजेंद्र पानसरे नितीन पानसरे आदी सह परिसरातील भक्तगण उपस्थित होते
यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे व संजय महाराज देशमुख यांनी सप्ताह विषयीची पूर्वतयारीची संपूर्ण माहिती दिली
यावेळी आमदार थोरात म्हणाले की स्वामी गगनगिरी महाराजांची सेवा करण्याची संधी जाखुरीकरांना मिळाली आहे या अद्भुत पूर्व सप्ताह मध्ये साधूसंत महंतांची सेवा करण्याचे पुण्य घ्या सर्वांच्या मदतीने हा सप्ताह ऐतिहासिक होणार यात शंका नाही या सप्ताहाचे सातवे पर्व असून या अगोदरही असा सप्ताह झाला नाही यापुढे असा होणार नाही असं कार्य आपण सर्वांनी मिळून करून दाखवायचे आहे सर्वांनी यात एकजुटीने सहभागी व्हा व मिळेल ती सेवा तन मनाने करा स्वामींचे आशीर्वाद आपल्या बरोबर असेल
कथा मंडप सर्व मंडप वॉटरप्रूफ , साधूंसंत विश्रांती मंडप, यज्ञ मंडप, घटस्थापना मंडप ,महिला जप मंडप, प्रहारेकरी मंडप तयार झाले प्रत्येक गावात बॅनर पोस्टर लावण्यासाठी हजारो गगनगिरी भक्त परिश्रम घेत आहे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन भरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे यावेळी जाखुरी पिंपरणे कनोली अंभोरे देवगाव शिरापूर निमगाव टेंभी कोळवाडे हंगेवाडी नागापूरवाडी जोर्वे खराडी वाघापूर या गावातील भक्त मंडळ यावेळी उपस्थित होते
