जोर्वे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज

 

साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती जोर्वे या ठिकाणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने साजरी करण्यात आली याप्रसंगी अध्यक्षस्थानी बलसाने गुरुजी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय दिघे हे होते प्रस्ताविक भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ बलसाने यांनी करतांना त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली की अण्णाभाऊ साठे एक विवेकी वादळ होते अण्णाभाऊंची ग्रंथसंपदा इतकी महान होती की दीड दिवसाची शाळा शिकलेले असतानाही 13 लोकनाट्य 35 कादंबऱ्या 3नाटके 13 कथा संग्रह एक शायरी पुस्तक 15 पोवाडे 1 प्रवास वर्णन सात चित्रपट कथा असे ग्रंथ संपदा निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशिया मध्ये जाऊंन गायला असे महान होते असे सांगितले तर मृणाली हिने अण्णाभाऊंची छक्कड गायली ,प्रणिती हिने अण्णाभाऊंच्या जीवनाविषयी खूप सुंदर असा प्रकाश टाकला प्रगती बलसाने हिने सुंदर अशी माहिती सागितली सूत्रसंचालन ओंकार बलसाने यांनी केले तर आभार वंचित बहुजन आघाडीचे जोर्वे गटनेते संजय बलसाने यांनी केली तर या कार्यक्रम प्रसंगी लक्ष्मीबाई बलसाने ,साहिल दिघे,मंथन बलसाने,आर्यन जमधडे, मृणाली बलसाने,प्रगती बलसाने , वेदांत बलसाने , सुवर्णा बलसाने, प्रणिती बलसाने, लहुजी बलसाने, गुरुप्रसाद जमदाडे, मानसी बलसाने, साईनाथ जमधडे, मनिषा बलसाने , गणेश बलसाने ,सुरेखा बलसाने , मंगल जमधडे सुमन जमधडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!