अंध निशी जरीवाला हिने रचला स्केटिंग क्रीडा क्षेत्रात नवीन जागतिक विक्रम
नाशिक / लोकवेध live न्यूज/ निलेश शेकोकार
आज स्केटिंग क्षेत्रात सक्षम आणि डोळस व्यक्तीला सुद्धा कामगिरी करणं खूप आव्हानात्मक होते .अशा परिस्थितीत निशी जरीवाला ह्या अंध मुलीने स्केटिंगच्या क्षेत्रात स्पर्धाच गाजवली नाही तर स्वतःच्या नावे नवीन जागतिक विक्रम रचला आहे. स्केटिंग म्हटलं म्हणजे वेग , तोल सांभाळणे हे करत सकारात्मकता , चिकाटी, वेळेचे व्यवस्थापन साधत तिने हे साध्य केले आहे . ही एक प्रेरणादायी कामगिरी आहे असे प्रतिपादन बारा जागतिक विक्रम करणारे व गरुड झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संदीप भानोसे यांनी केले.
निशी जरीवाला व तिचे मार्गदर्शक कोच सुशांत चौगुले खास मुंबईहून नाशिकला गरुड झेप प्रतिष्ठानने आयोजित समारंभा मध्ये शामिल झाले होते .डॉ भानोसे यांच्या हस्ते निशीला ब्रावो इंटरनॅशनल जागतिक विक्रम प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी जागतिक विक्रमवीर अंध सागर बोडके, अंजना प्रधान ,संकेत भा नो से , रेणू भानोसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गरुड झेप प्रतिष्ठानच्या सचिव संगीता भानोसे यांनी केले.
निशी ही मूळची वसईची आहे . करोना काळात तिचे आई व वडील दोघांनाही देव आज्ञा प्राप्त झाली. या दुःखद प्रसंगातही निशी खचली नाही. स्केटिंगचा आपला सराव प्रामाणिकपणे करत राहिली व जागतिक विक्रमच रचला .
2017 ला दिल्ली ते मुंबई अशी टंडन सायकल चालवून तिने लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदविले.आय आय जी एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट चे क्रीडा अध्यक्ष सुशांत चौगुले आणि बोरीवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन चे वरून सर,मुकेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली नीशी हे सर्व करते. आभार प्रदर्शन रेणू भानोसे यांनी केले .
