सशस्त्र सेना दलाच्या मेडीकल डेपो विभागाचे सुधाकर शेजवळ याचां सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न
नाशिक / लोकवेध / live न्यूज
नाशिक जिल्ह्याचे भुमिपुत्र व सशस्त्र सेना दलाच्या मेडीकल डेपो विभागात कार्यरत असणारे युनियनचे माजी उपसचिव व कर्मचारी आयु.सुधाकर शेजवळ याचां सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज सेना दलाच्या कांदीवली, मुंबई मेडीकल डेपोत मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी बिग्रेडियर मा. ए.के.सिंग साहेब यांच्या हस्ते मा.सुधाकर शेजवळ यांचा सत्कार करण्यात आला .याप्रसंगी युनियन अध्यक्ष अभिमन्यु म्हामुणकर,वर्क्स कमेटी मेंबर रविद्रं कदम,सागर गायकवाड ,शाम बनकर,विजय म्हैसधुने,सुनिल बागडे,रविद्रं बामने,शांताराम चाळके,सुनिल निकाळे,अविनाश कदम,सुभाष मंडल तसेच सेना दलातील जवान मेडिकल डेपो मधील कर्मचारी बंधु ,भगिनी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
