निमगाव जाळी येथे बांधकाम सुरक्षा साहित्य संच पेटी वाटप कार्यक्रम संपन्न
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
निमगाव जाळी येथे आज रोजी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब व इंद्रजितभाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार सुरक्षा साहित्य संच पेटी वाटप कार्यक्रम निमगाव जाळीच्या प्रथम लोकनियुक महिला सरपंच सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी निमगाव जाळी विविध कार्य सेवा सोसायटी चे संचालक सोमनाथ जोंधळे, ग्रा प सदस्य भास्कर खरात, तान्हाजी जोंधळे, गोरख वदक,संजय वदक, प्रकाश वदक, सोमनाथ खरात , आण्णा थोरात, दत्तू तळोले, आदी कार्यकर्ते आणि पुरुष व महिला लाभार्थी उपस्थित होते .
