संगमनेर बस स्थानक म्हणजे नाव मोठं लक्षण खोटं ; दिव्यांगांच्या शौचालयाची  बसस्थानकात गैरसोय.
सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने बस स्थानक चर्चेत
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे सात एकर जागेवर राज्यातील प्रथम क्रमांकाचे दोन मजली हायटेक आणि आर्कषक स्वरुपाचे, बसस्थानक प्रवाशांच्या सर्व सोयी सुविधांसाठी सज्ज आहे.परंतु सध्या याच बसस्थानकातील दिव्यांगाची शौचालये म्हणजे घाणीचे आणि अस्वच्छतेचे आगार बनते की काय अशी शंका प्रवाशांना येते,दिव्यांगांच्या शौचालयाचा स्वच्छता आणि निष्काळजी अभावी बोजवारा उडाला आहे.
सविस्तर वृत्त असे की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बसस्थानकातून दिवसभरात हजारो प्रवाशांची व शेकडो बसची वर्दळ असते,पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या या बसस्थानकावर इतर राज्यातील बसेस सुद्धा मोठ्या प्रमाणात फेऱ्या मारत असतात ‌परंतू या स्थानकात दिव्यांग लोकांसाठी जे शौचालय आहे त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे निष्काळजी अभावी त्यातील उपयोगी पाण्यांचे नळ आणि दरवाजा मोडकळीस आला असून कमोड भांडे देखील नेहमी अस्वच्छ असते या शौचालयात फावडे,घमेले, साफसफाईचे सामान सर्वत्र अस्थाव्यस्त पडलेले असते मुख्य दरवाजाची मोडतोड झाली आहे या शौचालयात दिव्यांग लोकांसाठी विनामूल्य सेवा आहे असा आदेश असतानाही तेथील सुलभ शौचालयाचे कर्मचारी जबरदस्तीने दिव्यांग लोकांकडून शुल्क आकारतात या सर्व प्रकारामुळे दिव्यांग लोकांची येथे मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी खेड्यापाड्यातून आणि इतर शहरातील अनेक दिव्यांग लोक येथे येत असतात या सर्व ‌सुविधा नेहमी प्रमाणे पुर्ववत व्हाव्यात अशी मागणी संतप्त दिव्यांग ‌लोकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!