दाढ बु येथे लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती उत्साहात साजरी

दाढ बु. / लोकवेध live न्यूज 

राहता तालुक्यातील दाढ बु येथे लोकशाहीर
डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती अतिशय आनंदात व उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली .
 यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. माशिम तात्या इनामदार हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रवरा बँकेचे संचालक मा. विजय तांबे व राहता तालुका पंचायत समितीचे सदस्य मा. गोरक्षनाथ सोपान पाटील तांबे व गावचे भूषण मा. लक्ष्मण वाणी  आदी सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणे उपस्थित होते  यावेळी लक्ष्मण वाणी यांनी हे मनोगत व्यक्त केले केले बाळासाहेब पाळंदे अशोक देहवळकर यांनी मनोगत व्यक्त केले रावसाहेब चव्हाण प्रतापराव तांबे प्रवरा -साखर कारखान्याचे संचालक थॉमस भोसले माजी सरपंच गाडेकर वैभव देवळकर योगेश सातपुते प्रशांत साळवे कृष्णा साळवे मा .रामनाथ बाबुराव साळवे (बहुजन समाज संघर्ष राहता तालुका अध्यक्ष व तसेच भारतीय लहुजी सेना आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!