दाढ खुर्द येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
दाढ खुर्द / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त दाढ खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व हनुमान वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथीच्या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्य पेन व वही व इतर साहित्य वाटप करत दाढ खुर्द येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आगळीवेगळी साजरी केली असून डीजे मिरवणूक आधी खर्चाला फाटा देत शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे याप्रसंगी दाढ खुर्द गावचे युवक काँग्रेसचे गटनेते किशोरराव जोशी ज्येष्ठ नेते नारायणराव कहार सरपंच सतीश जोशी उपसरपंच पती सुनील रावसाहेब जोशी शेतकरी विकास मंडळाचे नेते गणेशराव जोरी गणेश जोशी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस किशोर भाऊ वाघमारे ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब जमदाडे शाखाप्रमुख राजेंद्र जमदाडे तंटामुक्ती अध्यक्ष बाळा मल्हारी पर्वत लहुजी सेनेचे प्रमुख दगडू रघुनाथ साळवे अहिल्यादेवी पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक सिताराम पाटील साळवे डॉक्टर राजेंद्र साळवे सेवा सोसायटीचे चेअरमन मनोहर जोशी संतोष भडकवाड भाऊसाहेब आव्हाड शाहीर कांबळे सर डॉक्टर राजेंद्र साळवे सुनील साळवे अण्णा साळवे हनुमान वाडी शाळेचे मुख्याध्यापक अशोक गिरी सर श्री कानडे सर आदी मान्यवरासह पंचक्रोशीतून लहुजी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नेते नारायणराव कहार यांच्या हस्ते करण्यात आले असून पुष्पहार प्रतिमेला प्रवरा फळे भाजीपाला संस्थेचे संचालक अण्णा गेनू जोशी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले याप्रसंगी शाहीर कांबळे सर भाऊसाहेब आव्हाड संतोष भडकवाड नारायणराव कहार किशोरराव जोशी आदी प्रमुख मान्यवरांचे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त करण्यात आले याप्रसंगी गावचे विद्यमान उपसरपंच पती व श्री साई कॉम्प्युटर ग्राहक सेवा केंद्राचे डायरेक्टर सुनील रावसाहेब जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गावच्या ग्रामस्थांच्या वतीने व प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा दिल्या याप्रसंगी लहुजी सेनेचे दाढ खुर्द येथील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाऊसाहेब जमदाडे यांनी मनोगत व्यक्त करून मांडले
